Perfume Vs Deodorant : तुम्ही डिओ वापरता की, परफ्यूम? जाणून घ्या, दोघांमधील फरक

अधिक परफ्यूम एसेंसमुळे परफ्यूम डिओड्रंटपेक्षा अधिक उग्र असतात.
Perfume Vs Deodorant
Perfume Vs Deodorant Sakal
Updated on

Perfume Vs Deodorant : घामाच्या दूर्गंधीपासून सुटका व्हावी यासाठी अनेकजण डिओड्रंटचा वापर करतात. तर, अनेक जण ऑफिसमध्ये किंवा एखाद्या पार्टीमध्ये फ्रेशमध्ये वाटावे यासाठी परफ्युमचा वापर करतात.

Perfume Vs Deodorant
Mood Swing : तुमचाही मूड होतोय वारंवार स्विंग? करा हे उपाय
perfume
perfume

बहुतेक लोकांनी या दोन्ही गोष्टींचा रोजच्या ग्रूमिंगमध्ये समावेश केला आहे. पण अनेकांना या दोन्ही उत्पादनांमधील फरक नेमका काय? आणि याचा वापर नेमका कधी करावा याबाबत सांगणार आहोत.

Perfume Vs Deodorant
Winter Drinks : कडाक्याची थंडी पळवायची आहे; ट्राय करा हे 5 ड्रिंक्स

सुगंधात फरक

डिओड्रंट आणि परफ्यूममधील सर्वात मोठा फरक म्हणजे परफ्यूम हे एसेंसचे असते. एका परफ्यूममध्ये परफ्यूम एसेन्स 25 टक्क्यांपर्यंत असते, तर, डिओड्रंटमध्ये परफ्यूम एसेन्स फक्त 1-2 टक्क्यांपर्यंत असतो. या कारणास्तव परफ्यूमचा सुगंध डिओड्रंटपेक्षा अधिक उग्र असतो.

Perfume Vs Deodorant
Physical Relations: लग्नाआधी पार्टनरसोबत शारीरिक संबंध ठेवणे योग्य की अयोग्य?

दीर्घकाळ टिकतो

अधिक परफ्यूम एसेंसमुळे परफ्यूम डिओड्रंटपेक्षा अधिक उग्र असतात. यातील अधिक एसेंसमुळे याचा वास दीर्घकाळ टिकतो. तर, डिओड्रंटचा वास 4 तासांपेक्षा अधिक काळ टिकत नाही. या उलट परफ्यूमचा वास सुमारे 12 तास टिकतो.

घामाच्या वासापासून सुटका

शरीरातील घामाचा वास दूर करण्यासाठी परफ्यूम खूप प्रभावी आहे. पण घामाच्या दूर्गंधीवर ते कुचकामी ठरते. या उलट डिओड्रंटमध्ये अँटी-पर्स्पिरंट नावाचा पदार्थ असतो. जो शरीरातील घाम शोषून त्वचा चिकट होण्यापासून वाचवते. यामुळे आपल्याला दीर्घकाळ ताजेतवाने वाटते.

Perfume Vs Deodorant
Health : दिवसभरात शरीराला किती कॅलरीज गरजेच्या आहेत?

त्वचेवरी परिणाम

परफ्यूममध्ये मोठ्या प्रमाणात कॉन्संट्रेट असते. याचा थेट वापर त्वचेसाठी अत्यंत हानिकारक ठरू शकतो. त्यामुळे परफ्युमचा वापर करताना नेहमी केस आणि कपड्यांवरच लावावा. तर, डिओड्रंटमध्ये कॉन्संट्रेटचे प्रमाण कमी असते, त्यामुळे याचा वास त्वचेवर जास्त काळ टिकून राहतो.

किंमत

डिओड्रंट आणि परफ्यूममधील किंमतीमध्येदेखील मोठा फरक आहे. साधारणपणे डिओड्रंट्स बाजारात अत्यंत कमी किमतीत मिळतात. काही कंपन्यांचे कमी बजेटमध्येही परफ्यूमचे अनेक पर्याय उपलब्ध असतात. मात्र, चांगल्या ब्रँड आणि चांगल्या दर्जाचे परफ्यूमची किंमत खूप महाग असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.