Age and Fertility: तुम्हाला किती मुलं हवीत? १ किंवा २ मुलांना जन्म देण्यासाठी योग्य Age काय? महिलांनी या गोष्टींकडे गांभिर्याने पाहणं गरजेचं

Best age for pregnancy for female: अलिकडे महिलांमध्ये कन्सिव्ह करण्यासाठी अनेक समस्या निर्माण होवू लागल्या आहेत. पुढे जाऊन मुलाला जन्म देण्यासाठी समस्यांचा सामना करण्याएवजी जर तुम्ही योग्य वेळत मुलाचं प्लॅनिंग करण गरजेंचं आहे
right age to give birth
right age to give birthEsakal
Updated on

एककाळ असा होता की तेव्हा अगदी कमी वयातच तरुण तरूणी विवाहबंधनात अडकत असत. एवढचं नव्हे तर लग्नानंतर Marriage एक दोन वर्षात दोनाचे तीन होत. म्हणजेच कमी वयातच लग्नासोबत ते आई-वडिल बनत. What is the right age to give birth to children

मात्र सध्याच्या २१व्या शतकात शिक्षण, करियर आणि अनेक गोष्टींमुळे तरुण तरुणी उशिरा लग्न करत आहेत. काहीजण उशिरा लग्न Marriage करतात तर काहींनी योग्य वयात लग्न केलं तर कुटुंब Family वाढवण्यासाठी म्हणजेच मुलंबाळं जन्माला घालण्यासाठी काहीसा वेळ घेतात.

उशीरा लग्न Marriage किंवा योग्य वेळेत लग्न करूनही करियर Career किंवा सेव्हिंग घर अशा काही गोष्टींची पूर्तता करण्यासाठी अनेकजण वय वाढत असतानाही मुल जन्माला घालण्याचा विचार करत नाहीत.

यामुळेच अलिकडे महिलांमध्ये कन्सिव्ह करण्यासाठी अनेक समस्या निर्माण होवू लागल्या आहेत. पुढे जाऊन मुलाला जन्म देण्यासाठी समस्यांचा सामना करण्याएवजी जर तुम्ही योग्य वेळत मुलाचं प्लॅनिंग करण गरजेंचं आहे.

आई-वडिल बनू इच्छिणाऱ्यांनी मेडिकल सायन्स आणि विज्ञान तंत्रज्ञानाची मदत घेतली तर फॅमिली प्लॅनिंग करणं अधिक सोयीस्कर ठरू शकतं. नेदरलँडमधील इरास्मस युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटरमधील तज्ज्ञांनी एक मॉडेल विकसित केलंय. या मॉडेलच्या मदतीने फॅमिली सुरु करण्यासाठी कपल्स प्लॅन करू शकतात.

तज्ञांनी तयार केलेल्या टूलच्या मदतीने जोडप्यांना गर्भनिरोधक कधी थांबवावं हे कळतं. तसचं महिलांनी कोणत्या वयामध्ये पहिल्या, दुसऱ्या मुलाला जन्म द्यावा, हे देखील या टूलच्या मदतीने कळतं.

आई होण्यासाठी हे वय उत्तम

आई होण्यासाठी किंवा बाळ जन्माला घालण्यासाठी महिलेचं वय हा एक महत्वाचा घटक आहे. ३० वर्षांपर्यंत एखाद्या स्त्रीची आई होण्याची शक्यता सर्वात जास्त असते. तर ३५ वर्षापर्यंत महिलांमध्ये काही हार्मोनल बदल तसचं शारिरीक बदल आणि ताण तणावामुळे आई होण्याचे चान्सेस कमी होवू लागतात.

१९७० सालामध्ये साधारण २३-२४व्या वर्षा महिला पहिल्या मुलाला जन्म देत. आता हे वय २८-२९ झालं आहे. तज्ञांच्या मते महिला भविष्यात येणाऱ्या फर्टिलिटीच्या समस्यांचा विचार करत नसल्याने किंवा त्यांना याबद्दलची माहिती नसल्याने पुढे जाऊन फर्टिलिटीच्या समस्या निर्माण होतात.

हे देखिल वाचा-

right age to give birth
Family Planning : गर्भधारणेचे नियोजन करणाऱ्या जोडप्यांसाठी आवश्यक आहेत या चाचण्या

एकच मुलं हवं असल्यास आई होण्याचं वय

नेदरलँडमधील इरास्मस युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटरमधील तज्ञांच्या रिपोर्टनुसार जर तुम्हाला एकच मुलं हवं असेल आणि आधीच तुम्ही एक मुल ठेवण्याचा विचार केला असेल तर ४१ वय होईपर्यंत प्रतिक्षा केली जाऊ शकते. अर्थात वयाच्या पस्तीशीनंतर कन्सिव्ह करण्याचे चान्सेस ५० टक्क्यांनी कमी होतात.

NHS नियमितपणे अनप्रोटेक्टेट म्हणजेच कोणतही गर्भनिरोधक न वापरता शारिरीक संबध ठेवल्यास एका वर्षातच गर्भधारणा होण्याची शक्यता ८५ टक्के असते. मात्र जर महिलेचं वय जास्त असेल तर याच अडचण निर्माण होवू शकते. यासाठीच जर तुम्हाला एकच मुल हवं असेल आणि ३० वर्षापूर्वी आईदेखील व्हायचं नसेल तर ३२ते ३३ वय हे मुलाला जन्म देण्यासाठी योग्य वय आहे.

हे देखिल वाचा-

right age to give birth
Family Tips : अशी असते आदर्श सून, तुम्हालाही बनायचंय? मग हे वाचाच

दोन मुलं हवी असल्यास आई होण्याचं वय

जर तुम्हाला दोन मुलं हवी असतील तर मात्र जास्त विलंब करून चालणार नाही. यासाठी तुम्हाला २७ वर्षीच पहिल्या मुलाला जन्म देणं गरजेचं आहे. या वय़ात आई होण्याची शक्यता सगळ्यात जास्त असते. तर साधारण ३-४ वर्षांनी म्हणजेच ३५ वर्षांच्या आत जवळपास ३२-३३ वय असताना दुसऱ्या मुलासाठी प्लान करता येईल.

३४ वर्ष वय असेपर्यंत गर्भधारणा होण्याची शक्यता ७५ टक्के असते तर ३८नंतर ही केवळ ५० टक्के असते.

एकंदरच या अभ्यासावरून योग्य वेळेत गर्भधारणेसाठी किंवा गर्भधारणेसाठी कोणत्या समस्या निर्माण होवू नयेत यासाठी विवाहाचं आणि मुलाचं प्लॅनिंग आधीपासूनच करणं गरजेचं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.