Benefits of Vitamin D : व्हिटॅमीन D साठी सूर्यप्रकाश आहे महत्वाचा; जाणून घ्या सूर्यप्रकाश घेण्याची योग्य वेळ आणि फायदे

व्हिटॅमीन डी च्या कमतरतेमुळे कॅल्शिअम शरीरात शोषले जात नाही. त्यामुळे, हाडे कमकुवत होतात.
Benefits of Vitamin D
Benefits of Vitamin Desakal
Updated on

Benefits of Vitamin D : आपल्या शरीराला योग्य संतुलित आहार आणि व्यायामाची जोड असेल तर आपले आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. शरीराला अनेक पोषकघटकांची आवश्यकता असते. या पोषकघटकांमध्ये व्हिटॅमीन डी चा देखील समावेश आढळून येतो.

व्हिटॅमीन डी हे एक महत्वाचे जीवनसत्व आहे. या व्हिटॅमीनची कमतरता अनेक लोकांमध्ये आढळते. हे व्हिटॅमीन डी आपल्या शरीरात तयार होत नाही. आपल्या त्वचेमध्ये असलेले कोलेस्ट्रॉल जेव्हा सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येते, तेव्हा ते तयार होते.

व्हिटॅमीन डी च्या शरीरातील कमतरतेमुळे कॅल्शिअम शरीरात शोषले जात नाही. त्यामुळे, हाडे कमकुवत होऊ लागतात. त्यामुळे, व्हिटॅमीन डी साठी शरीराला पुरेसा सूर्यप्रकाश मिळणे आवश्यक आहे. मात्र, याचा अर्थ असा नाही की, तुम्ही किती ही वेळ सूर्यप्रकाशात बसावे. यामुळे, तुम्हाला नुकसान पोहचू शकते.

आज आपण व्हिटॅमीन डी मिळवण्यासाठी सूर्यप्रकाशात कधी आणि किती वेळ बसावे? आणि व्हिटॅमीन डी चे शरीराला होणारे फायदे कोणते? त्याबद्दल जाणून घेणार आहोत.

Benefits of Vitamin D
Vitamin D Deficiency : महिलांनो शरीरातील Vitamin D ची कमतरता ठरू शकते घातक, इग्नोर करू नका; नाहीतर..

व्हिटॅमीन डी मिळवण्यासाठी सूर्यप्रकाशात केव्हा आणि किती वेळ बसावे?

व्हिटॅमीन डी मिळवण्यासाठी शक्यतो दुपारच्या कडक उन्हात बसणे टाळावे. या कडक उन्हात बसण्यापेक्षा तुम्ही सकाळच्या कोवळ्या उन्हात साधारण १० ते २० मिनिटे बसलात तरी चालेल.

यामुळे, शरीरातील व्हिटॅमीन डी ची कमतरता दूर होण्यास मदत होते. दुपारच्या कडक उन्हात यूव्हीबी किरणे खूप तीव्र असतात, असे संशोधनात आढळून आले आहे. त्यामुळे, दुपारच्या कडक उन्हात बसणे टाळावे.

व्हिटॅमीन डी चे फायदे कोणते ?

  • सूर्यप्रकाशातून मिळणारे व्हिटॅमीन डी हे आपल्या केसांसाठी आणि त्वचेसाठी अतिशय फायदेशीर आहे. यामुळे, आपले केस निरोगी आणि मजबूत राहण्यास मदत होते.

  • आपल्या शरीराला व्हिटॅमीन डी चा योग्य प्रमाणात पुरवठा झाला तर आपली रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यास मदत होते. त्यामुळे, संक्रमण आणि इतर आजारांची भीती कमी राहते.

  • व्हिटॅमीन डी मुळे आपल्या त्वचेतील ऑक्सिजनची पातळी वाढण्यास मदत होते. ज्यामुळे, आपला चेहरा फ्रेश आणि निस्तेज दिसतो.

Benefits of Vitamin D
Health Care : हिवाळ्यात किती प्रमाणात पाणी प्यावे? कमी पाणी प्यायल्याने होऊ शकते नुकसान

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()