How to Apply Sunscreen : उष्णतेचा पारा वाढला.! सनस्क्रिन किती वेळा लावावे? अन् लावण्याची योग्य पद्धत कोणती? घ्या जाणून

How to Apply Sunscreen : वाढत्या उष्णतेचा सर्वाधिक परिणाम त्वचेवर आणि आरोग्यावर होतो. त्वचेची काळजी घेण्यासाठी प्रामुख्याने सनस्क्रिनचा वापर केला जातो.
How to Apply Sunscreen
How to Apply Sunscreenesakal
Updated on

How to Apply Sunscreen : उन्हाळ्यात खास करून आरोग्याची आणि त्वचेची काळजी घेतली जाते. कारण, या वाढत्या उष्णतेचा सर्वाधिक परिणाम त्वचेवर आणि आरोग्यावर होतो. त्वचेची काळजी घेण्यासाठी प्रामुख्याने सनस्क्रिनचा वापर केला जातो. सनस्क्रिन चेहऱ्यावर लावल्यामुळे सूर्याच्या अतिनील किरणांपासून त्वचेचे संरक्षण होते. त्वचेचा कर्करोग, सुरकुत्या, रंगद्रव्य आणि सनबर्न रोखण्याचे काम सनस्क्रिन करते.  

त्वचेवर सनस्क्रिन लावल्याने टॅनिंग देखील टाळता येते. परंतु, जर सनस्क्रिनचा योग्य वापर केला नाही तर उन्हामुळे तुमची त्वचा खराब होऊ लागते. अशा परिस्थितीमध्ये सनस्क्रिनबद्दल लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. जसे की, सनस्क्रिन लावण्याची योग्य पद्धत कोणती? सनस्क्रिन किती प्रमाणात लावावे? या प्रश्नांची उत्तरे आज या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.

How to Apply Sunscreen
Sunscreen Applying Tips : सनस्क्रिन लावण्यापूर्वी 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा त्वचेवर दिसू शकते टॅनिंग

सर्वात आधी मॉइश्चरायझर की सनस्क्रिन?

त्वचेवर सनस्क्रिन लावण्यापूर्वी मॉइश्चरायझरचा वापर करावा की सनस्क्रिनचा? हा प्रश्न बहुधा सर्वांनाच पडला असावा. याचे योग्य उत्तर असे आहे की, त्वचेवर सर्वात आधी मॉइश्चरायझर लावा त्यानंतर सनस्क्रिन लावा.

सनस्क्रिन लावण्याची योग्य पद्धत

त्वचेवर सनस्क्रिन लावण्यापूर्वी सर्वात आधी सनस्क्रिनची बॉटल चांगली हलवून घ्या. त्यानंतरच, सनस्क्रिन त्वचेवर लावावे. केवळ चेहऱ्यावर सनस्क्रिन लावणे हे पुरेसे नाही तर कान, मान, घसा, पाठ आणि हातापायांवर ही सनस्क्रिन लावावे. तुम्ही SPF ने युक्त असलेले बॉडी लोशन देखील हात आणि पायांवर लावू शकता.

किती प्रमाणात सनस्क्रिन लावावे?

एकावेळी साधारणपणे ३० मिली पर्यंतचे सनस्क्रिन तुम्ही त्वचेवर वापरू शकता. सनस्क्रिन लावण्यापूर्वी तुमच्या हातावर सनस्क्रिन घ्या. आता बोटांच्या मदतीने चेहऱ्यावर सनस्क्रिन लावा आणि ते हळूहळू पसरवा. दर २ तासांनी तुम्ही सनस्क्रिन लावू शकता.

सनस्क्रिन स्टिक

दिवसा सनस्क्रिन लावण्यासाठी तुम्ही तुमच्यासोबत सनस्क्रिनची स्टिक ठेवू शकता किंवा SPF असलेली कॉम्पॅक्ट पावडर देखील लावू शकता. जेणेकरून तुमचा मेकअप खराब होणार नाही. तसेच, तुम्ही दिवसातून किती ही वेळा त्वचेवर सनस्क्रिन लावू शकता.

स्विमिंग किंवा वर्कआऊट केल्यावर लावा सनस्क्रिन

जर तुम्ही उन्हात पोहायला गेला असाल किंवा व्यायाम करून घरी परत आला असाल, तरीही त्वचेवर सनस्क्रिन लावायला विसरू नका. यामुळे, त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होईल.

How to Apply Sunscreen
Sunscreen Lotion : महागडे सनस्क्रीन लोशन घेण्यापेक्षा, घरच्या घरीच या पद्धतीने स्वस्तात मस्त बनवा

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.