Screen Time Limit किती असावी? या डिवायसेसमुळे दृष्टी होते कमजोर, दिसून येतील ही 6 लक्षणं

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, 2010 मध्ये जवळपास दोन अब्ज लोकांना मायोपिया झाला होता आणि 2030 पर्यंत ही संख्या 3.3 अब्ज पर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
Screen Time Limit
Screen Time Limitesakal
Updated on

Screen Time Limit : आजच्या आधुनिक युगात, डिजिटल उपकरणे आपल्या दैनंदिन जीवनात खोलवर रुजलेली आहेत. मात्र आपलं पूर्णपणे त्यांच्यावर अवलंबून असणे हा चिंतेचा विषय आहे. आपला स्क्रीन टायमिंग जेवढा जास्त असेल तेवढ्या डोळ्यांच्या समस्या जास्त उद्भवतील.

विशेष चिंतेची बाब म्हणजे लहान मुलांमध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा मोठ्या प्रमाणावर वापर त्यांच्या डोळ्यांसाठी घातक ठरतोय. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, 2010 मध्ये जवळपास दोन अब्ज लोकांना मायोपिया झाला होता आणि 2030 पर्यंत ही संख्या 3.3 अब्ज पर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

जाणून घ्या काय सांगतात एक्सपर्ट्स

जेएनआर चिल्ड्रन आय केअर अँड स्क्विंट क्लिनिकचे डॉ. सिद्धार्थ केसरवानी म्हणतात, “गेल्या काही दशकांमध्ये, डिजिटल उपकरणांच्या वाढत्या वापरामुळे मायोपिया किंवा दूरदृष्टीचे प्रमाण वाढले आहे. किशोरवयीन मुलांमध्ये स्क्रीन टाइम आणि मायोपियाचायाची वाढ सर्वाधिक असल्याचे संशोधनात दिसून आले. स्क्रीन टायमिंगचा तीन वर्षांखालील मुलांवर जास्त परिणाम होतो.

अलीकडेच प्रकाशीत झालेल्या एका प्रकाशनाने मुलांनी स्क्रीन वापरून घालवलेला वेळ आणि लहान मुलांमध्ये, तरुण व प्रौढांमधील मायोपियाची वाढलेली शक्यता आणि तीव्रता यांच्यातील संबंधावर प्रकाश टाकला आहे. या संशोधनामध्ये 3,000 हून अधिक अभ्यासांचे विस्तृत विश्लेषण समाविष्ट आहे ज्यामध्ये 3 महिने ते 33 वर्षे वयोगटातील व्यक्तींमध्ये स्मार्ट डिव्हाइसचा वापर आणि मायोपिया यांच्यातील परस्परसंबंधांचा शोध घेण्यात आला.

उपलब्ध डेटाचे बारकाईने परीक्षण आणि न्यूमरल संश्लेषण केल्या गेले. त्यातून संशोधकांनी एक उल्लेखनीय निष्कर्ष काढला की मोबाइल फोनसारख्या स्मार्ट डिव्हाइस स्क्रीनच्या दीर्घकाळापर्यंत वापरामुळे मायोपिया विकसित होण्याचा धोका अंदाजे 30% वाढतो. शिवाय, जेव्हा संगणकाचा अत्याधिक वापर मोठ्या स्क्रीन टाइमसह होतो तेव्हा हा धोका अंदाजे 80% वाढतो.

Screen Time Limit
‘Screen Time’ वाढल्याने ‘Brainfog’चा धोका!; आरोग्‍यावर होतायत गंभीर परिणाम

दृष्टी कमजोर झाल्यास मुलांमध्ये दिसतात ही लक्षणं

दूर असलेल्या वस्तू पाहण्याचा प्रयत्न करताना अंधुक दिसतं.

वारंवार डोकेदुखीचा त्रास होतो.

दूरच्या वस्तूंवर दीर्घकाळ लक्ष केंद्रित केल्यानंतर डोळ्यांचा ताण जाणवतो.

“मुलांच्या बाबतीत, त्यांना वर्गात व्हाईटबोर्ड किंवा प्रोजेक्ट केलेल्या स्क्रीनवरील माहिती पाहण्यात अडचण येऊ शकते. लहान मुले स्पष्टपणे पाहण्यात अडचणी येऊ शकतात, परंतु ते सतत डोकावून पाहणे, दूरच्या वस्तूंबद्दल अनभिज्ञ दिसणे, जास्त डोळे मिचकावणे, वारंवार डोळे चोळणे यांसारखी लक्षणे दिसू शकतात असे, डॉ. केसरवाणी म्हणतात.

दूरचं दिसण्यात अडचणी येत असलेल्या प्रौढांना रस्त्यांवरील चिन्हे किंवा स्टोअरमधील चिन्हे वाचणे चॅलेंज ठरू शकते. काही व्यक्तींना कमी-प्रकाशात अंधुक दिसू शकते, जसे की रात्रीच्या वेळी वाहन चालवताना, जरी त्यांची दृष्टी दिवसाच्या प्रकाशात स्पष्ट असली तरीही रात्री त्यांना नीट दिसत नाही. या विशिष्ट स्थितीला नाईट मायोपिया असे म्हणतात. (Social Media)

Screen Time Limit
‘Screen Time’ वाढल्याने ‘Brainfog’चा धोका!; आरोग्‍यावर होतायत गंभीर परिणाम

स्क्रीम टाइम लिमीट किती असावी?

आजच्या डिजिटल युगात, स्क्रीन टाइम टाळणे फारच कठीण आहे, कारण आजच्या युगात कामासाठी, शाळा आणि सोशल मीडिया आणि टेक्स्टिंगद्वारे मित्रांशी संपर्कात राहता येते. प्रौढांनी त्यांचा दैनंदिन स्क्रीन वापरात कामासाठी आठ तास आणि विश्रांतीसाठी दोन तास शिल्लक ठेवण्याकडे लक्ष्य केंद्रित करावे. लहान मुलांच्या स्क्रीन टायमिंगवर तज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. कारण सर्वाधिक स्क्रीन टायमिंग त्यांचा असल्याचे दिसून येते. (Eye Care)

Screen Time Limit
EYE CARE डोळ्यांपासून किती दूर पकडावा मोबाईल...घ्या जाणून

2 ते 5 वर्षे वयोगटातील मुलांसाठी आठवड्याच्या दिवसात एक तासापेक्षा कमी आणि आठवड्याच्या शेवटी तीन तासांपर्यंत स्क्रीन वेळ असावा. 6 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या मुलांसाठी, निरोगी सवयी आणि दिनचर्येसह स्क्रीन टाइम संतुलित करण्याचा सल्ला दिला जातो. अमेरिकन अॅकॅडमी ऑफ चाइल्ड अँड अॅडॉलेसेंट सायकॅट्री देखील कौटुंबिक जेवण आणि बाहेर पडताना स्क्रीन टाळणे, बेडरूमच्या बाहेर इलेक्ट्रॉनिक उपकरणे ठेवणे आणि झोपण्याच्या किमान 30 मिनिटे आधी स्क्रीन बंद करण्याचे सुचवते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.