आयुष्यात 'या' गोष्टींसोबत चुकूनही करु नका तडजोड!

तडजोड केल्यामुळे तुमच्या मानसिकतेवर आणि नातेसंबंधांवरही होऊ शकतो परिणाम
आयुष्यात 'या' गोष्टींसोबत चुकूनही करु नका तडजोड!
Updated on

आयुष्य life जगत असताना प्रत्येकालाच लहान मोठ्या चढउतारांचा, संकटांचा सामना करावा लागतो. परंतु, या परिस्थितीमध्ये खचून न जाता खंबीरपणे प्रत्येक गोष्ट हाताळणं गरजेचं असतं. अनेकदा असेही प्रसंग घडतात ज्यात आपल्याला मनाविरुद्ध तडजोड करावी लागते. मात्र, वारंवार तडजोड केल्यामुळे त्याचा परिणाम तुमच्या मानसिकतेवर आणि नातेसंबंधांवरही होण्याची शक्यता असते. म्हणूनच, आयुष्यात कितीही संकट आली तरीदेखील कोणत्या गोष्टींसोबत तडजोड करु नये हे आज जाणून घेऊयात. (what-should-you-never-compromise-in-a-life-ssj93)

१. कुटुंब आणि मित्र परिवाराला वेळ द्या -

तुम्ही कितीही टेन्शनमध्ये किंवा संकटात असलात तरीदेखील आपल्या कुटुंबाला वेळ द्या. कारण, आपलं कुटुंबच आपली खरी ताकद असते. त्यामुळे संकटकाळात कुटुंबच तुमची साथ देऊ शकतं हे लक्षात घ्या. तसंच मनावरील ताण कमी करायचा असेल तर मित्रपरिवार हा हवाच. मित्रांच्या सानिध्यात राहिल्यामुळे तुम्ही तुमची सुख-दु:ख त्यांच्यासोबत शेअर करु शकता. ज्यामुळे मनावरील ताण कमी होईल. परंतु, अनेकदा काही जण टेन्शनमध्ये असताना मित्रपरिवार आणि कुटुंबाकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे या नातेसंबंधांमध्ये तणाव निर्माण होतो. आधीच संकटात असताना हा परिवारदेखील दूर गेला तर मानसिक ताण वाढण्याची शक्यता अधिक असते त्यामुळे. कितीही टेन्शन असलं तरीदेखील कुटुंब व मित्रपरिवारासोबत तडजोड करु नका.

२. निर्णय -

अनेकदा काही जण इतरांच्या आनंदासाठी मनाविरुद्ध काही निर्णय घेतात. परंतु, हे निर्णय घेत असताना पुढील आयुष्यात तुम्हाला पश्चाताप होणार नाही याची काळजी घ्या. अनेक जण करिअर निवडताना, लग्न करताना किंवा मूल जन्माला घालतानासुद्धा इतरांचा विचार करतात. परंतु, जर हे निर्णय घेताना तुमची मनापासून संमती असेल तरच पुढचं पाऊल टाका. मनाविरुद्ध तडजोड करुन कोणताही निर्णय घेऊ नका.

आयुष्यात 'या' गोष्टींसोबत चुकूनही करु नका तडजोड!
तुमचा व्हॅट्स अ‍ॅप DP कोण चोरुन पाहतंय माहितीये?

३. करिअर निवडताना -

वयाच्या १७-१८ वर्षांपर्यंत प्रत्येक जण आई-वडिलांचं बोट धरुन चालत असतो. परंतु, वयाची १८ वं वर्ष ओलांडलं की मुलांना त्यांच्या करिअरच्या वाटा निवडण्याचं स्वातंत्र्य असतं. मात्र, अनेक जण या काळातसुद्धा कुटुंबीय किंवा अन्य दुसऱ्या व्यक्तींवर अवलंबून असतात. त्यामुळे निदान करिअर निवडताना तरी स्वत:चं मत विचारात घ्या. कारण, करिअरवरच आपलं सगळं आयुष्य अवलंबून असतं. त्यामुळे शांतपणे तुम्हाला जे योग्य वाटेल तेच करिअर निवडा. त्याबाबत कोणतीही तडजोड करु नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.