मानवाने केलेल्या संशोधनांमध्ये प्रेशर कुकरचाही समावेश आहे. ती अतिषय उपयोगी गोष्ट आहे. कुकरमूळे अनेक गोष्टी पटकन होतात. त्यामुळे गॅस अन् वेळेचीही बचत होते. त्यामुळे प्रत्येक किचममध्ये कुकरचा वापर केला जातो.
प्रेशर कुकरचा वापर आपण प्रत्येक गोष्टीसाठी करतो. पण, काही पदार्थ कुकरमध्ये शिजवणं हानिकारक ठरू शकतं. तुम्ही वेळ वाचेल म्हणून कुकर वापरत असाल तर ते तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरेल. असे कोणते पदार्थ आहेत जे कुकरला शिजवू नयेत हे पाहुयात. (Kitchen Tips )
बटाटे
प्रेशर कुकरचा सर्वाधिक वापर हा बटाटे उकडण्यासाठी केला जातो. कारण, हवे तसे मऊतूस बटाटे उकडण्यासाठी अधिक वेळ जातो. त्यामुळे, बटाटा उकडण्यासाठी कुकर वापरणे सोयीस्कर वाटते. पण, कुकर वापल्याने बटाट्यांमध्ये असलेले साखरेचे प्रमाण वाढते.
त्यामुळे बटाट्यांमधील पोषक तत्व कमी होतात. बटाट्यांमध्ये अधिक प्रमाणात ऍन्टी न्युट्रिएंट्स असतात. जे आपल्या शरीराला पोषक तत्व मिळवून देण्यात अपयशी ठरतात.
भात
कुकरमध्ये शिजवलेला मऊसूत भात अन् तूप अनेकांना आवडतो. पण, भात कुकरमध्ये शिजवल्याने त्यातील स्टार्च एक्रिलामाइड रसायन वाढते. जे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
पालक
पालेभाजी अधिक प्रमाणात शिजवल्याने त्यातील पोषक घटक निघून जातात. त्यामुळे ती कधीही कुकरला शिजवू नये. पालक आणि डाळीची आमटी केली जाते. तेव्हा डाळ शिजवून घेऊन त्यावर चिरून पालक घातला तरी तो पटकन शिजतो. त्यामुळे पालक कुकरमध्ये शिजवू नका.
मासे
ण असे करू नका. कारण, मासे कुकरला शिजवले तर त्यातील ओमेगा ऍसिड हे महत्त्वाचे पोषत घटक निघून जातो. त्यामुळे, मंद आचेवर माशांचे कालवण शिजवा.
भाज्या
कुकरमध्ये फळभाज्या शिजवताना विशेष काळजी घ्यावी लागते. कुकरमध्ये भाज्या अधिक गरम होतात. त्यामुळे, त्यातील आपल्यासाठी फायदेशीर गुणधर्म निघून जातात. कुकरमधील असलेल्या अधिक उष्णतेमुळे असे होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.