मुंबई : नात्यात विश्वास असणं खूप गरजेचं आहे. असं अनेकदा घडतं की, आपण आपल्या जोडीदारावर आंधळा विश्वास ठेवतो आणि तो मात्र आपला विश्वासघात करतो. छोट्या-छोट्या चुका प्रत्येकजण करतो. त्यामुळे लगेच नातं तोडायची गरज नाही.
समजा तुमचा नवरा तुमच्यापासून दुरावतो आहे असं वाटत असेल तर त्याला कसं सामोरं जायचं हे जाणून घेऊ. (what to do if husband is ignoring you )
स्त्रिया आपल्या पतीबद्दल खूप भावनिक असतात. त्यामुळे त्याच्या चुकीबद्दल बोलायला त्या घाबरू शकतात. पण ही चूक महागात पडू शकते. हेही वाचा - ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ !
ऑफिसमधील महिलेवर क्रश
बर्याच वेळा काही पुरुषांना ऑफीसमधल्या महिलेबरोबर जास्त वेळ घालवायला आवडते. अशा परिस्थितीत तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या पतीशी याबद्दल थेट बोलले पाहिजे.
अनेकवेळा पती स्वत: याविषयी तुम्हाला माहिती देत नाही, पण जर एखाद्या मित्रामार्फ तुम्हाला याची माहिती मिळाली तर खूप वाईट वाटते. अशा परिस्थितीत पतीवर संशय घेण्याऐवजी त्याच्याशी बोलले पाहिजे. या छोट्या गोष्टी कधी कधी खूप मोठ्या होतात.
पतीला समजावून सांगा
पतीशी कोणत्याही गोष्टीवर भांडू नका. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तुमच्या पतीशी बोलू शकता. त्याच्या कामापासून सुरुवात करा. तुमच्या सहकाऱ्यांबद्दल बोला. हळूहळू त्याच्या महिला सहकारीबद्दल विचारा.
थेट विचारणेही चुकीचे नाही पण त्यात खेळीमेळीचा भाव असावा. यामुळे तो तिच्याबाबत किती गंभीर आहे हे कळेल. तुम्हा दोघांविषयीच्या चांगल्या आठवणींना उजाळा द्या. तो तुमच्याबाबत किती गंभीर आहे हेही कळेल. कदाचित चांगल्या आठवणींमुळे तुम्ही पुन्हा जवळ याल.
वेळ घालवा
नवऱ्याला पुरेसा वेळ देणेही गरजेचे आहे. त्यासाठी नोकरी-व्यवसायात तडजोड करण्याची अजिबात गरज नाही. तुम्ही दोघं एकत्र किती वेळ घालवता यापेक्षा कसा वेळ घालवता हे महत्त्वाचं आहे.
त्याच्यासोबत वेळ घालवताना त्यालाच महत्त्व द्या. मुलं झाल्यानंतरही नवऱ्यासाठी थोडा वेळ काढा. तो तुम्हाला किती वेळ देतो हेही महत्त्वाचे आहे. तो वेळ देत नसेल तर त्याच्याकडे स्पष्टपणे याबद्दल तक्रार करा, कारणही जाणून घ्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.