Mothers Day 2024 : मदर्स डेची सुरूवात जिने केली तिलाच तो बंदही करायचा होता? कारण...

तिचे नातेवाईकही हा दिवस साजरा करत नाहीत. त्यामागे एक कारण दडलेलं आहे
Mothers Day 2024
Mothers Day 2024esakal
Updated on

Mothers Day 2024 :  

मदर्स डे हा आईवरील प्रेम व्यक्त करणारा दिवस आहे. त्यादिवशी सगळे लोक आईसाठी गिफ्ट घेतात, तिच्यासाठी फुले, आवडता पदार्थ, आवडच्या ठिकाणाची टूर घडवतात. आईसाठी हा दिवस स्पेशल बनवण्यासाठी प्रत्येकजण धडपडत असतो.

आईने आपल्याला जन्म दिला, तिने आपल्यासाठी तिचे आयुष्य झिजवले तिच्यासाठी वर्षातला एक दिवस साजरा केला जातो. मदर्स डे एका तरूणीने तिच्या आईसाठी सुरू केला. पण नंतर तिलाच तो बंद करायचा होता? (Mothers Day 2024)

Mothers Day 2024
Mother's Day 2024 : यंदाच्या जागतिक मातृदिनी आईला द्या आकर्षक भेटवस्तू, जाणून घ्या 'हे' भन्नाट ऑप्शन्स

इतकेच नाहीतर जिने हा दिवस सुरू केला,तिचे नातेवाईकही हा दिवस साजरा करत नाहीत. त्यामागे एक कारण दडलेलं आहे. ते कोणते हे पाहुयात.

प्रत्येकाला माहित आहे की दरवर्षी मदर्स डे मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी साजरा केला जातो. ही परंपरा सुमारे 111 वर्षांपासून सुरू आहे. या दिवसाची सुरुवात ऍना जार्विस यांनी केली होती. तिने हा दिवस आपल्या आईला समर्पित केला आणि त्याची तारीख अशा प्रकारे निवडली की ती त्याच्या आईची पुण्यतिथी, 9 मे च्या आसपास आली. यावेळी 12 मे रोजी मदर्स डे येत आहे.

तर खरं तर ऍना जर्विसच्या आई रीव्स यांना हा दिवस साजरा करायचा होता. एक आई असून आईसाठी जगात एखादा दिवस असावा अशी त्यांची इच्छा होती. पण, 1905 मध्ये रीव्स यांचे निधन झाले. रिव्स यांची ती इच्छा अपूर्णच राहीली.

Mothers Day 2024
World Lupas Day 2024 : महिलांच्या शरीरावर दिसणारी सूज असू शकते या गंभीर आजाराची चाहूल, जाणून घ्या Lupas आजाराबद्दल

ही गोष्ट ऍनाच्या लक्षात होती. तिने त्यासाठी पुढाकार घेतला. 1908 मध्ये ऍनाने सर्वात पहिला मदर्स डे साजरा केला. तिने लोकांना आईचे आपल्या जीवनात असलेले महत्त्व सांगितले. तसेच, तिने आजवर दिलेल्या प्रेमाच्या बदल्यात आपण तिला काहीतरी देऊयात, ही भावना तिने लोकांमध्ये जागृत केली.

जगात पहिल्यांदा मदर्स डे साजरा करण्यात आला. तेव्हा ऍना जार्विस ही एक प्रकारे पोस्टर गर्ल होती. त्याने त्या दिवशी आपल्या आईची आवडती पांढरी कार्नेशन फुले महिलांना वाटली. पण दरवर्षी हीच फुले वाटायची असे लोकांनी ठरवले. लवकरच या फुलांचे बाजारीकरण इतके वाढले की, येत्या काही वर्षांत मातृदिनाच्या दिवशी पांढऱ्या कार्नेशनच्या फुलांचा काळाबाजार करण्याचा प्रकार सुरू झाला.

Mothers Day 2024
World Red Cross Day 2024 : जागतिक रेडक्रॉस दिवस का साजरा केला जातो? या वर्षीची थीम काय आहे? जाणून घ्या एका क्लिकवर

लोक अधिक किंमतीतही फुले विकत घेण्याचा प्रयत्न करू लागले. हे पाहून ऍना संतप्त झाली. तिने हा दिवस संपवण्याची मोहीम सुरू केली. मदर्स डेच्या दिवशी व्हाईट कार्नेशनच्या फुलांची विक्री झाल्यानंतर टॉफी, चॉकलेट आणि सर्व प्रकारच्या भेटवस्तूही लोकप्रिय होऊ लागल्या. ऍनाने लोकांना खडसावले.

लोकांनी स्वार्थापोटी या प्रेमळ दिवसाचे व्यापारीकरण केले. त्यामुळे लोकांमध्ये स्पर्धा निर्माण झाली आहे. ज्या उद्देशाने मी या दिवसाची सुरूवात केलेली तो उद्देश मागे पडला आहे, असे ऍना त्यावेळी म्हणत राहीली. पण तोवर वेळ निघून गेली होती. लोकांनी तिच्याकडे दुर्लक्ष करत राहीले.

Mothers Day 2024
National Technology Day 2024 : भारतात आजच्या दिवशी का साजरा केला जातो तंत्रज्ञान दिन?

1920 मध्ये ऍनाने लोकांना फुले खरेदी न करण्याचे आवाहनही केले होते. ऍना शेवटच्या क्षणापर्यंत हा दिवस संपवण्यासाठी प्रयत्न करू लागली. त्यासाठी तिने स्वाक्षरी मोहीमही राबवली, पण ती यशस्वी झाली नाही आणि १९४८ च्या सुमारास ऍना हे जग सोडून निघून गेली.

कुटुंबीय आजही साजरा करत नाहीत Mothers Day

ऍनाचे कुटुंबीय आजही हा दिवस साजरा करत नाहीत. काही वर्षांपूर्वी मीडियाला दिलेल्या मुलाखतीत ऍनाच्या नातेवाईक एलिझाबेथ बार यांनी सांगितले होते की, तिच्या काकू आणि वडिलांनी कधीही मदर्स डे साजरा केला नाही, कारण ते ऍनाचा खूप आदर करतात. व्यापारीकरणामुळे या खास दिवसाचा अर्थच बदलून गेला आहे, त्यामुळे हा दिवस आमचे कुटुंबीय साजरा करत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.