आपण नवरात्रीत आणि व्हॅलेंटाईन विकमध्ये रंगांना अधिक महत्त्व देतो. कारण, रंग आपल्या जीवनात खूप महत्त्वाचे असतात. नवरात्रीत नऊ दिवस वेगवेगळे रंग सांगितले जातात. अन् महिला पुरूष दोघेही ते फॉलो करतात.
तसेच मैत्रिचेही काही खास रंग आहेत. मैत्रीचा रंग पिवळा इतकेच तुम्हाला माहिती असेल. पण, मैत्रीसाठी इतर रंगही शुभ आहेत. आज फ्रेंडशिप डे आहे. आज दिवसभराचे तुम्ही काही प्लॅन केले असतील.
मित्रांना कुठले बँड्स बांधायचे हेही तुमचे ठरले असेल. पण, आम्ही तुम्हाला काही खास रंग सांगणार आहोत. जे तुमचा आजचा दिवस अगदी स्पेशल बनवतील. त्या रंगाचे ड्रेस परिधान करून तुम्ही हा दिवस साजरा करा.
ज्योतिषशास्त्रात काही रंग आपल्यासाठी शुभ असल्याचे सांगितले जाते. काही राशीच्या लोकांसाठी विषेश रंग शुभ असतात. त्यामुळेच, आजच्या दिवशी मित्रांना या रंगाचे बँड्स हातावर बांधल्याने तुमच्यातील मैत्री अजन्म टिकेल, असे ज्योतिषशास्त्रांचे म्हणणे आहे. ते रंग कुठले आहेत हे जाणून घेऊयात.
गुलाबी रंग हा प्रेमाचे प्रतिक आहे. हा रंग प्रत्येक मुलीचा फेव्हरेट आहे. हाच रंग तुमच्या व तुमच्या मित्रांमधील प्रेम दर्शवतो. या रंगाचा बँड तुम्हाला मित्राने बांधला तर असं समजा की, तुमचा मित्र तुमच्यावर प्रेम करतो. त्याला तुमची पूर्ण काळजी घ्यायची आहे. त्यामुळेच तुम्हीही तुमच्या मित्राला या रंगाचा बँड बांधा.
मैत्रीचा पिवळा रंग आहे. हा रंग मैत्रीत असलेला साधेपणा सांगतो. पिवळा रंग मैत्रीतील विश्वास आणि पारदर्शकता सांगत असतो. फ्रेंडशिप डे निमित्त जर कोणी तुम्हाला पिवळ्या रंगाची बँड बांधला तर याचा अर्थ त्याची तुमच्याशी खरी मैत्री आहे. आणि ही मैत्री शेवटपर्यंत टिकवायची आहे. अशा व्यक्ती प्रत्येक सुख-दु:खात तुमच्या पाठीशी उभ्या राहतात. अशा मित्रांसोबत तुमच्या आयुष्यात संकट कधीच येऊ शकत नाही.
लाल रंग मैत्रीतील आपुलकी जिव्हाळा स्पष्ट करते. लाल रंग हा तुम्हाला धोक्याची घंटाही सांगत असतो. अगदी तसंच,तुमच्या जीवनातील प्रत्येक संकट मित्र दूर करतो. हा रंग तुमच्या मित्रांमधील प्रेम दर्शवतो.
मुलांचा आवडता रंग कुठला असं विचारलं तर निळा रंग असं अनेकजण म्हणतात. जर मित्रांनी तुम्हाला निळ्या रंगांचे बँड दिला तर याचा अर्थ तुम्ही त्यांच्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवू शकता. असे लोक खूप विश्वासार्ह असतात. ते मनाने सच्चे आणि मैत्री निभावणारे असतात, अशी मान्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.