Pregnancy Tips : कोणत्या काळात लैंगिक संबंध ठेवल्यास गर्भधारणा करणे सोपे जाईल ?

म्हणजेच स्त्रियांना दर महिन्याला पाळी येते. या पाळीवर गर्भधारणेचे चक्र अवलंबून असते.
Pregnancy Tips
Pregnancy Tips google
Updated on

मुंबई : अनेकदा महिलांना गरोदर राहण्याची इच्छा असते; मात्र अनेकदा प्रयत्न करूनही त्या गरोदर राहू शकत नाहीत. यामागे गर्भधारणा प्रक्रियेमागचे अज्ञान कारणीभूत असते.

गर्भधारणेनंतर बाळासाठी आवश्यक असणारं रक्त गर्भधारणा झालेली नसताना स्त्रीच्या शरीरातून बाहेर टाकलं जातं. म्हणजेच स्त्रियांना दर महिन्याला पाळी येते. या पाळीवर गर्भधारणेचे चक्र अवलंबून असते. त्यामुळे शरीरसंबंध ठेवताना पाळीच्या तारखांचा विचार होणे आवश्यक आहे. हेही वाचा - First Paralympic Winner : मुरलीकांत पेटकर सांगतायत अपंग खेळाडूंसमोरील आव्हाने

Pregnancy Tips
Sperm Count : शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी पुरुषांनी करावीत ही योगासने

मासिक पाळीच्या आधीचा दोन आठवड्यांचा काळ हा सर्वाधिक महत्त्वाचा असतो. या काळात महिलांमध्ये गर्भ ठेवण्याची क्षमता असते. या काळात महिलेच्या अंडाशयातून अंडी बाहेर टाकली जातात. या प्रक्रियेला ओव्हल्यूशन म्हणतात.

ओव्हल्यूशनच्या या काळाला फर्टिलिटी विंडोदेखील म्हटलं जातं. या काळात महिलेने पुरुषाशी लैंगिक संबंध ठेवल्यास त्या सहज गर्भधारणा करू शकतात.

या काळात प्रोटेक्शनशिवाय संबंध ठेवल्यास पुरुषाचे शुक्राणू सहजरित्या अंड्याला परिपक्व करू शकतात. अंडाशयातील अंडी १२ ते २४ तास सक्षम असतात. तसेच शुक्राणू ३ ते ५ दिवस महिलेच्या शरीरात जिवंत राहू शकतात. त्यामुळे हा काळ गर्भधारणेसाठी उत्तम असतो.

Pregnancy Tips
Relationship Tips : वैवाहिक आयुष्यासाठी उत्तम आहेत या ६ लैंगिक स्थिती

ओवह्युलेशनचा कालावधी कसा ओळखायचा ?

मासिक पाळीच्या आधी दोन आठवडे ओव्ह्युलेशनचा कालावधी असतो. या दरम्यान शरीराचं तापमान सर्वसामान्यपणे १ अंशाने वाढत असतं. ल्युटेनाइजिंग संप्रेरकांची पातळी वाढलेली असते. होम ओव्ह्युलेशन किटद्वारे याची तपासणी करता येते.

योनीमार्गातून स्राव जाण, स्तन ओढल्यासारखे वाटणं आणि पोटात एकाच बाजूला दुखणं, ही ओव्ह्युलेशनची लक्षणं आहेत. ओव्ह्युलेशनचा नेमका कालावधी माहीत करून घेण्यासाठी ओव्ह्युलेशन स्ट्रिप्सचा वापर करावा. यानुसार गर्भधारणेचं नियोजन सोपं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.