World's Most Expensive Wine : भारतात मद्याचे शौकिन खूप आहेत. काही लोकांच्या घरातही बार असतो. वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिस्की घेतात. पण तुम्हाला whisky आणि whiskey मधला फरक माहिती आहे का?
काय आहे फरक?
स्कॉटलंड आणि अमेरिकेच्या मद्यावर आपली वेगळी ओळख दाखवण्यासाठी ते लोक व्हिस्कीच्या स्पेलिंगमध्ये E वापरून whiskey लिहिले जाते. तर भारतीय बाजारात स्कॉटिश, जपानी आणि कॅनडाच्या मद्यावर उदाहरणार्थ जॉनी वॉकर, ब्लॅक अँड व्हाइट एंटीक्विटी या बाटल्यांवर whisky लिहिलेले असते.
जगातली सगळ्यात महागडे मद्य कोणते?
जगातल्या सगळ्यात महागड्या मद्याचा विचार केला तर टकीला ले 925(Tequila ley 925) हे आहे. या मद्यापेक्षा त्याची बॉटल महाग आहे. या बाटलीवर ६४०० हिरे लावलेले आहेत. मेक्सिकोमध्ये लाँच झालेल्या मद्याची किंमत एवढी जास्त आहे की, अजून कोणी खरेदी करू शकलेले नाही. या मद्याची किंमत २५.४ कोटी रूपये आहे.
तर दुसऱ्या नंबरवर अमांडा डी ब्रिगनैक मिडास(Armand De Brignac Midas) आहे. याची किंमत १ कोटी ४० लाख रूपयांहून जास्त आहे. तिसऱ्या नंबरवर डेलमोर 62(Dalmore 62) असून याची किंमत १ कोटी ५० लाखाहून जास्त आहे. या कंपनीच्या मालकाच्या मते अजूनपर्यंत फक्त १२ बाटल्या बनवल्या आहेत.
चौथ्या नंबरवर डीवा वोडका (Diva Vodka) याची किंमतपण साधारण दीड कोटीच्या जवळ आहे. हेनरी IV डुडोगॉन हेरिटेज कॉन्यैक(Henri IV Dudgeon Heritage) पाचव्या नंबरवर आहे. याची किंमत १४ कोटी ५६ लाख ९३ हजार रूपये आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.