White Teeth : घरात असलेल्या या वस्तूंनी मोत्यासारखे चमकतील पिवळे दात, प्रयोग करून तर पहा

म्हणून डॉक्टर नेहमी सांगतात की, दिवसातून दोन वेळा ब्रश करा
White Teeth
White Teethesakal
Updated on

White Teeth :  

आजकाल चेहऱ्याच्या सौंदर्याचा विचार जास्त केला जातो. डोळे, नाक चेहऱ्याचा शेप कसे रेखीव होतील याकडे लक्ष दिले जाते. सौंदर्यात भर घालणारे ओठही आकर्षक लिपस्टीकने रंगवले जातात. पण, दातांच्या सौंदर्याकडे लक्ष दिले जात नाही. सौंदर्य म्हणजे पांढरेशुभ्र मोत्यासारखे दिसणारे दात प्रत्येकालाच आकर्षित करतात. स्वच्छ आणि चमकदार दात तुमच्या व्यक्तिमत्त्वात आकर्षण निर्माण करतात.    

तोंडाच्या आरोग्याचा देखील एकूण शारीरिक आरोग्यावर थेट परिणाम होतो. खाद्यपदार्थांमध्ये अनेक प्रकारचे मसाले वापरले जातात, ज्यामुळे दात पिवळे होऊ शकतात. हे टाळण्यासाठी प्रत्येकाला दिवसातून दोनदा दात घासण्याचा सल्ला दिला जातो. (Home Remedies

White Teeth
Yellow Teeth: दात पिवळे दिसताहेत? करा ‘हे’ घरगुती सोपी उपाय

आजकाल अनेक लोक दात पिवळे होण्याच्या समस्येने झुंजत आहेत. दोन वेळा ब्रश केल्यानंतरही अनेक लोक या समस्येने त्रस्त आहेत. दातांच्या डॉक्टरकडे जाऊन दात साफ करता येत असले तरी ते पुन्हा पुन्हा करून ती ट्रिटमेंट करून घेणे शक्य नसते. अशा परिस्थितीत लोक चिंताग्रस्त होतात. आज आम्ही तुम्हाला दातांचे पिवळे पडणे दूर करण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय सांगणार आहोत, जे खूप प्रभावी ठरू शकतात.

पिवळे दात पांढरे आणि चमकदार करण्यासाठी काळजी घेतली पाहिजे. निष्काळजीपणामुळे दातांचे नुकसान होऊ शकते. असे केल्याने दातांची संवेदनशीलता आणि पोकळीचा धोकाही वाढू शकतो.

White Teeth
Teeth Cleaning : महागड्या ट्रिटमेंट्स कशाला? हे घरघुती उपाय करत मिळवा मोत्यासारखे पांढरेशुभ्र दात

दात स्वच्छ ठेवण्याचा सर्वात सुरक्षित मार्ग म्हणजे नियमितपणे ब्रश करणे. याशिवाय दात पिवळे पडू शकतात असे पदार्थ खाल्ल्यानंतर दात घासावेत. 2018 च्या अभ्यासानुसार, दात पांढरे करणाऱ्या टूथपेस्टने ब्रश केल्याने तुमचे दात स्वच्छ होऊ शकतात. यासाठी तुम्ही इलेक्ट्रिक टूथब्रश देखील वापरू शकता.

White Teeth
Teeth Cavity Remedies : किडलेल्या दातांची लाज वाटते? दात पुन्हा चमकवेल हा भन्नाट उपाय!

पिवळे दात पांढरे करण्यासाठी घरगुती उपाय

बेकिंग सोडा आणि हायड्रोजन पेरॉक्साइडचा वापर दातांचा पिवळसरपणा दूर करण्यासाठी केला जाऊ शकतो. बेकिंग सोडा आणि हायड्रोजन पेरोक्साईडची पेस्ट वापरल्याने दातांवर साचलेले प्लेक आणि बॅक्टेरिया काढून टाकतात. त्याची पेस्ट तयार करण्यासाठी, 1 चमचे बेकिंग सोडा 2 चमचे हायड्रोजन पेरॉक्साइडमध्ये मिसळा. या पेस्टने दात घासल्यानंतर स्वच्छ करा.

White Teeth
Healthy Teeth: निरोगी आणि स्वच्छ दात हवेत? मग ‘या’ पदार्थांचा आहारात समावेश करा!

ऍपल सायडर व्हिनेगर

ऍपल सायडर व्हिनेगरचा वापर पिवळे दात उजळण्यासाठी केला जाऊ शकतो. 1 कप पाण्यात 2 चमचे सफरचंद सायडर व्हिनेगर मिसळून माउथवॉश बनवा. हे द्रावण तोंडात 30 सेकंदांसाठी फेटा. नंतर पाण्याने आणि ब्रशने स्वच्छ धुवा. मात्र, त्याचा जास्त वापर करू नये, अन्यथा दातांना नुकसान होऊ शकते. ते फक्त थोड्या काळासाठी वापरा.

White Teeth
Kanye West Titanium Teeth : रॅपर कान्ये वेस्ट याने बसवले टायटेनियमचे दात; खर्च ऐकून व्हाल आवाक्

लिंबू,संत्री केळीची साल

लिंबू, संत्री आणि केळीच्या सालींमुळेही दात पिवळे पडण्यापासून सुटका मिळते. ही साले दातांवर घासल्याने पिवळसरपणा दूर होतो आणि दात पांढरे आणि चमकदार होतात. असे मानले जाते की या सालींमध्ये असलेले डी-लिमोनिन आणि सायट्रिक ऍसिड तुमचे दात पांढरे करण्यास मदत करते. दात स्वच्छ करण्यासाठी या फळांची साले काढून ती हळू हळू दातांवर 2 मिनिटे चोळा त्यानंतर काही वेळाने ब्रश करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.