गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर पश्चिम आफ्रिकेतील एक किस्सा चांगलाच चर्चिला जात आहे. तांजानियामध्ये एक महिला संसद पॅण्ट परिधान करुन संसदेतील अधिवेशनात सहभागी झाल्यामुळे त्यांना अधिवेशनातून बाहेर काढण्यात आलं. त्यामुळे ही घटना सध्या सोशल मीडियावर चर्चिली जात असून अनेकांनी पश्चिम आफ्रिकी सरकारवर टीकास्त्र डागलं आहे. मात्र, याचसोबत सोशल नेटवर्किंगवर आणखी एक चर्चा रंगली आहे. ती म्हणजे कोणत्या महिलेमुळे जीन्स (jeans) परिधान करण्याची प्रथा सुरु झाली. आज आपण असंख्य मुली, स्त्रिया पाहतो ज्या सर्रास जीन्स (jeans), ट्राऊझर (trousers) घालून वावरत असतात. परंतु, प्रथम जीन्स घालणारी महिला कोण? हा प्रश्न आता नेटकऱ्यांना पडू लागला आहे. म्हणूनच, महिलांमध्ये जीन्सची फॅशन प्रचलित करणाऱ्या कोको शेनेल यांच्याविषयी जाणून घेऊयात. (who-and-how-did-started-wearing-trousers-for-women-and-who-inspired-them)
पहिल्या महायुद्धानंतर कोको शेनेल यांनी स्त्री जगतातील फॅशनची संकल्पना बदलली. त्यांनी पहिल्यांदा ट्राऊझर वापरण्यास सुरुवात केली आणि पुढे हीच महिलांची फॅशन झाली. कोस्टने प्रवास करत असतांना कोको शेनेल या पुरुषांच्या फॅशनमुळे प्रभावित झाल्या होत्या. त्यामुळे १९२० मध्ये त्यांनी स्वत: साठी ट्राऊझर्स शिवून घेतल्या आणि त्या दिवसापासून महिलांमध्ये जीन्स, ट्राऊझरची फॅशन रुजू लागली.
पाश्चात्य फॅशनमध्ये क्रांती घडवून आणणाऱ्या शेनेलच आहेत असं म्हटलं जातं. त्यांनी केवळ जीन्सच नव्हे तर 'लिटल ब्लॅक ड्रेस' , टाय, हॅण्डबॅग, शूज असे अनेक नवीन ट्रेंडदेखील त्याकाळी सुरु केले होते. त्यामुळे कोको शेनेल यांनी महिलांना फॅशनच्या बाबतीत प्रचंड पुढे आणलं असं म्हटसं जातं.
दरम्यान, शेनेल आज त्यांच्या प्रसिद्ध परफ्यूम ब्रॅण्डसाठी ओळखल्या जातात. मात्र, त्यांनी महिलांच्या फॅशनजगतात अनेक नवीन बदल घडवून आणले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.