तरूणांपेक्षा ज्येष्ठांचे मद्य सेवन करण्याचे प्रमाण अधिक; संशोधनातून माहिती आली समोर

व्यापक सामाजिक, सांस्कृतिक, तांत्रिक, आर्थिक बदल घडल्याने तरूणाईत प्रमाण कमी झाले आहे
drink
drink
Updated on

वर्षाच्या शेवटी अनेक ऑफिसमध्ये गेट-टूगेदर, ख्रिसमस लंच आणि नवीन वर्षाच्या पार्ट्या असतात. यानिमित्ताने तरुण मुलांना मद्य (Drink)पिण्याचे निमित्त मिळते. तशी संधी ते बरोबर साधतात. आपल्या आजूबाजूला घजणाऱ्या प्रसंगांमुळे आजवर आपण असेच समजत होतो. पणऑस्ट्रेलिया, यूके, नॉर्डिक देश आणि उत्तर अमेरिकेतील तरुण मुलं, त्यांच्या पालकांच्या तुलनेत कमी प्रमाणात मद्यपान करतात, असे आढळले आहे.

कोविड लॉकडाऊन दरम्यान, या संदर्भात काही सर्वेक्षणे झाली. त्यातून तरूणाईचे मद्य पिण्याचे प्रमाण आणखी कमी झाल्याचे सूचित केले आहे हे प्रमाण कमी झाल्याची शक्यता सरकारी प्रयत्नांमुळे झालेली नाही. व्यापक सामाजिक, सांस्कृतिक, तांत्रिक आणि आर्थिक बदल हे या घसरणीसाठी महत्त्वाचे आहेत. विविध देशांतील तरुणांसोबत मुलाखत-घेत अभ्यास करणार्‍या संशोधकांनी तरुणांचे मद्यपान कमी होण्याची अनिश्चितता आणि भविष्याबद्दल चिंता, आरोग्याबद्दल चिंता, तंत्रज्ञान आणि विश्रांतीमध्ये बदल आणि पालकांशी संबंध बदलणे ही चार कारणे सांगितली आहेत.

मागीन पिढ्यांना त्याची गरज वाटत नव्हती. पण आता अनेक तरुण योग्य विचार करत आहेत. ते त्यांच्या जीवनावर नियंत्रण मिळवण्याचा आणि भविष्य सुरक्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. काही दशकांपूर्वी, मद्यपान करणे हा अभ्यासाच्या नित्यक्रमातून वेळ काढण्याचा एक चांगला मार्ग म्हणून मोठ्या प्रमाणावर पाहिले जात असे.मात्र आता काहींना दारू पिण्याची भीती वाटते, हेही दिसून आले आहे.

drink
'या' मद्यासाठी हेच ग्लास का वापरतात, जाणून घ्या
Health
Health Google

तरूणाई आरोग्याविषयी अधिक जागरूक (Young people are health-conscious)

तरूणाईत आरोग्याचे महत्व खूपच वाढू लागले आहे. १५-२० वर्षांपूर्वीच्या संशोधनात असे आढळून आले आहे की तरुण लोक जास्त मद्यप्राशन करत असतल्याने त्याचे आरोग्यावर वाईट परिणाम होत आहेत. मात्र, अलीकडील अभ्यासातून असे दिसले की, तरूणाई अल्कोहोलच्या वापरामुळे मानसिक आरोग्य आणि दीर्घकालीन शारीरिक आरोग्याच्या जोखमींबद्दल चिंता व्यक्त करत आहे. तर, ऑस्ट्रेलियन आणि स्वीडिश येथे केलेल्या संशोधनात असेही आढळले आहे की काही तरुणांना मद्यपानाचे सामाजिक फायदे महत्त्वाचे वाटतात. मात्र १९९०, २००० च्या तुलनेत निर्धारित मद्यपान चा निकष बदलला आहे.

माझ्या जवळच्या लोकांनी ते पाहिले तर ( if my employer sees that?)

तंत्रज्ञानाने तरुण लोकांचा सामाजिक आयाम बदलला आहे. त्याचा तरूणांच्या मद्यपानावर परिणाम झाला आहे. नाईट आउट करताना सोशल मीडियावरील फोटोसाठी ड्रिंक धरून ठेवणे सामान्य गोष्ट आहे. तरीही, तरुण लोक त्यांच्या ऑनलाइन फोटोतून असे करताना दिसणार नाही याची काळजी घेतात. संशोधनात असे आढळून आले आहे की तरुणांना सोशल मीडियावर मद्यपान करतानाचा फोटो पाहिला तर काय होईल याची चिंता वाटते. त्यामुळे ते असे फोटो टाकत नाहीत तसेच मद्यपान कमी करण्यावर भर देतात.

drink
तुम्ही 'मेड फॉर इच अदर' आहात हे कसं ठरवाल? चार टिप्स फॉलो करा
Family health Care
Family health CareSakal

बदलते कौटुंबिक संबंध (Changing family relationships)

किशोरवयीन मुलांचे संगोपन आणि त्यांची मद्यपानाशी ओळख करण्याच्या शैली एका पिढीमध्ये विकसित झाल्या आहेत. बरेच पालक रात्रीच्या वेळी त्यांच्या मुलांचे निरीक्षण करतात आणि मागील पिढ्यांपेक्षा त्यांच्या मद्यपानावर अधिक बारकाईने लक्ष ठेवतात. ते मोबाईलमुळे सहज शक्य होते. आता तरुण लोक त्यांच्या पालकांसोबत अधिक वेळ घालवतात, संवादावर अधिक भर देतात. त्यामुळे त्यांची पिण्याची आणि बंड करण्याची गरज कमी होते.

जास्त मद्यपान करणे 'कूल' नाही

यामागे अनेक कारणे आहेत. संस्कृती आणि धार्मिक संबंध, आरोग्य परिस्थिती आणि वैयक्तिक प्रेरणा यांमुळे तरुण लोक अल्कोहोलचे सेवन मर्यादित करत असावेत. एकंदरीत, या बदलांचा अर्थ असा आहे की बरेच तरुण लोक नशेला कूल" मानत नाहीत. तसेच ते स्वातंत्र्य आणि प्रौढत्वाचे प्रमुख चिन्ह म्हणून पाहत नाहीत. मध्यम प्रमाणात दारू पिणे त्यांना ठिक वाटते. तसेच मद्यपान न करण्यावरही अनेकजण भर देतात.

drink
किस करा.. फिट राहा... होतात ५ फायदे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()