Creative Ideas in Bathroom : बाथरूममध्ये सर्वात जास्त क्रिएटिव्ह आयडिया सुचतात असे तुम्ही अनेकांकडून ऐकले असेल. कदाचित तुमच्यासोबतही असंच काहीसं घडत असेल.
अशा परिस्थितीत मनात प्रश्न पडतो की असे का होते? बऱ्याच काळापासून शास्त्रज्ञ या विषयावर संशोधन करत आहेत आणि त्यामागील कारण काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. अखेर प्रदीर्घ संशोधनानंतर आता व्हर्जिनिया विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांना या प्रश्नाचे उत्तर सापडले आहे. यामध्ये त्यांनी बाथरूममध्ये लोकांचे विचार पूर्णपणे भिन्न का असतात? याबाबत काही गोष्टींचा उलगडा केला आहे.
क्रिएडिव्ह आणि पूर्णपणे भिन्न कल्पनांसाठी एकाग्रता अत्यंत महत्त्वाची आहे, परंतु एखाद्या विषयावर मेंदूचा अतिरेकी वापर केल्याने ते उलटदेखील होऊ शकते. यामुळे त्याचे चुकीचे परिणाम दिसू शकतात. त्यामुळे एखाद्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी किंवा काहीतरी नवीन आणि वेगळ्या विचारासाठी ब्रेक घेणे आवश्यक आहे, असे मत बाथरूममध्ये क्रिएटिव्ह आयडिया या विषयावर संशोधन करणारे व्हर्जिनिया विद्यापीठातील संशोधक जॅक इर्विंग यांचे आहे. चांगल्या क्रिएटिव्हीसाठी ब्रेक ही यातील पहिली अट आहे.
...म्हणून बाथरूममध्ये येतात क्रिएटिव्हा आयडिया
बाथरूममध्ये आंघोळ करताना किंवा इतर काम करताना आपले मन पूर्णपणे शांत स्थितीत असते. अशा परिस्थितीत माणूस शांत मनाला ताण न देता विचार करतो. शांत मनाने व्यक्ती वेगवेगळ्या दिशेने विचार करण्यास सक्षम असतो, म्हणून बाथरूममध्ये एखाद्या गोष्टीवर त्वरीत उपाय सापडतात. जेव्हा एखादी व्यक्ती कोणत्याही अडचणींशिवाय विचार करते तेव्हा त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतात असे इर्विंग म्हणातात.
इर्विंग यांच्या संशोधनापूर्वी झालेल्या संशोधनात शास्त्रज्ञांनी अशा आयजियाज येण्यामागे शॉवर असल्याचे कारण दिले होते. उन्हाळ्यात डोक्यावर थंड पाणी आणि हिवाळ्यात कोमट पाणी डोक्यावर टाकले तर, मेंदू अधिक कल्पना निर्माण करू शकतो. मात्र, या संशोधनाच्या पूर्णपणे उलट इर्विंगचे यांचे संशोधन आहे.
वरील दोन्ही संशोधनाच्या आधारावर अचूक उत्तर शोधणे कठीण होते. त्यामुळे याचे नेमके उत्तर शोधण्यासाठी आणखी एक संशोधन करण्यात आले. 2015 हे संशोधन करण्यात आले. ज्यामध्ये असे नमुद करण्यात आले की, जर आपण जबरदस्तीने विचार करण्याचा प्रयत्न केला तर, क्रिएटिव्ह कल्पना निर्माण होत नाही. तसेच एकाच वेळी अनेक गोष्टी मनात चालू असतील, तर यादरम्यान येणाऱ्या कल्पना फारशा क्रिएटिव्ह नसतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.