मकर संक्रांतीचा (Makar Sankranti) सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मकर संक्रांत भारतात मोठया आनंदाने आणि उत्साहात साजरी केली जाते. या सणाबद्दल लहानांपासून मोठ्यापर्यंत एक आकर्षण असतं. यादिवशी लोकं आपल्या ओळखीच्या माणसांच्या हातावर तीळ-गूळ देतात.
मकर संक्रांतीचा सण हिंदू धर्मात विशेष मानला जातो. देशभरात मकर संक्रात हा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी सूर्य हा धनू राशीतून शनिचा पुत्र मकर राशीत प्रवेश करतो. म्हणून या दिवसानंतर दिवस हा मोठा आणि रात्र लहान होते. नववर्षातला पहिला सण मोठ्या उत्साहने साजरा केला जातो. या वर्षातील मकर संक्रांत रविवार १५ जानेवारीला येत आहे.
सूर्य मकर राशीत प्रवेश करत असल्याने या वेळेस ‘मकर संक्रांती’ असे म्हणतात. एक राशीला सोडून दुसर्या राशीत प्रवेश करण्याच्या प्रक्रियेस संक्रांती म्हणतात. मकरसंक्रांतीला काळा रंग आवर्जून परिधान केला जातो.
तसेच या सणाला नवविवाहित वधूच्या पहिल्या संक्रांतीला तिला काळी साडी भेट म्हणून दिली जाते. त्यामुळे मकर संक्रांतीला काळी कपडेच का परिधान केली जातात? याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होत असतात.
पुराणातील अशी एक कथा सांगितली जाते की, सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याची पत्नी छाया म्हणजे सावलीने काळे वस्त्र परिधान केलेलं होतं. हे झालं कथेतील कारण, मात्र, यामागचे वैज्ञानिक कारणाबद्दल सांगायचे झाल्यास हा हिवाळ्यातील सर्वात थंड दिवस असतो. त्यामुळेच अधिक उष्णता शोषून घेणारे काळे कपडे या दिवशी आवर्जून परिधान केले जातात. इतर कोणत्याही रंगाच्या कपड्यांच्या तुलनेत उष्णता शोषून घेण्याची काळ्या रंगाची क्षमता अधिक असते. त्यामुळे शरीराला ऊब मिळते.
काळ्या रंगाच्या कपड्यांचा फायदा शरीर उबदार ठेवण्यासाठी होतो. म्हणून अगदी लहान मुलांपासून वयस्कर लोकांपर्यंत सारेच जण या दिवशी काळ्या कपड्यांना प्राधान्य देतात. शिवाय आपल्या शरीराला उष्णता मिळावी शरीर उष्ण राहावं म्हणून या सणाला तिळगूळ वाटले जातात याचं कारण हेच की सणाच्या निमित्ताने आपल्या शरीरात तिळाचे काही तत्व जावेत आणि आपलं थंडीपासून संरक्षण व्हावं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.