तुम्ही खूप थकला असाल, कंटाळला असाल आणि अचानक तुम्हाला काहीही कारण नसताना रडू कोसळतं. किंवा बाहेरच्या थंडीने तुम्ही गारठले आहात, तुम्ही घरी जाता, गरमागरम चहा प्यायची तुमची इच्छा आहे, पण लक्षात येतं की दूधच संपलंय, अशावेळी तुम्हाला रडू कोसळतं. कधी विचार केलाय का? असं विनाकारण, छोट्या छोट्या गोष्टीत रडू का कोसळतं?
तुम्ही आजारी असाल, नाराज असाल, किंवा थकलेले असाल, प्रत्येक वेळी रडायलाच का येतं? दुसरी कोणती भावना किंवा प्रतिक्रिया का उमटत नाही? मनावर निय़ंत्रण का राहत नाही? अश्रू हे आपल्या मनाच्या अवस्थेबद्दलचे संकेत देणारे असतात. अत्यानंद होणं, नाराज होणं, अशा भावना अश्रूंच्या माध्यमातून दिसून येतात. तीव्र भावनांमुळे आपल्या मध्यवर्ती चेता संस्थेतला भावनांचा भाग कार्यरत होतो. आपल्याला बरं वाटावं यासाठी चेता संस्था कार्यरत होते आणि अश्रू ओघळतात.
पण जेव्हा आपण थकतो किंवा तणावात असतो, तेव्हा का रडतो? आपल्याला लहानपणापासूनच भावनांवर नियंत्रण ठेवायला शिकवलं जातं. समाजाने ठरवून दिलेल्या पद्धतीने व्यक्त होणं शिकवलं जातं. म्हणजे एखादा चित्रपट पाहून डोळ्यात पाणी येणं स्वाभाविक असतं पण कामाच्या ठिकाणी रडणं किंवा डोळ्यात पाणी येणं हे अजून समाजमान्य नाही. जेव्हा आपण थकलेलो असतो किंवा तणावात असतो, तेव्हा आपली अवस्था एकाच वेळी अनेक प्रोग्रॅम सुरू असलेल्या कम्प्युटरसारखी झालेली असते. अशा अवस्थेच मेंदूची भावनांवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता काहीशी कमी होते आणि परिणामी अश्रू ओघळतात.
श्वसनासंबंधी आजार जसं की सर्दी, कोरोना अशा आजारांमध्येही डोळे पाणावणं सामान्य लक्षण आहे. जेव्हा शरीरात एखाद्या बाहेरचा विषाणू प्रवेश करतो, तेव्हा पांढऱ्या रक्तपेशी सक्रीय होतात आणि त्या विषाणूशी लढण्यासाठी तयार होतात. या पांढऱ्या रक्तपेशींमुळे डोळ्यातल्या रक्तवाहिन्यांना सूज येते, ज्यामुळे डोळ्यातून पाणी येतं. मानवी शरीरक्रियेतला एक नैसर्गिक घटक म्हणजे अश्रू. काहीवेळा रडण्याने खूप बरं वाटतं, मोकळं वाटतं. पण तुम्ही जर अनावश्यक आणि सततच रडत असाल, तर अशा परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.