Nutmeg for Babies in Winter : हिवाळ्यात बाळांना जायफळ का खाऊ घातले जाते? फायदे जाणून घ्या
Nutmeg for Babies in Winter : थंडीमध्ये बाळांसाठी खास काळजी घेणं महत्त्वाचं असतं. त्यातच जायफळ एक खास मसाला आहे. जे कि बाळांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो. हिवाळ्यात बाळांना जायफळ का दिलं जातं, हे जाणून घेऊया!
हिवाळ्यात आपल्याला थोडा उबदारपणा आणि पौष्टिक आहाराची गरज असते, विशेषतः बाळांसाठी. नवजात बालकांची प्रतिकारशक्ती प्रौढांच्या तुलनेत खूपच कमकुवत असते. थोडा जरी निष्काळजी पणा केला तरी बाळाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.