Eat Fruit With Skin: तुम्ही देखील या Fruitsची सालं काढून खाताय तर हे वाचा, साल काढल्याने कमी होते पौष्टिकता

काही अभ्यासामधुन हे समोर आलं आहे की अनेक फळांच्या सालांमध्ये Fruit Skin अधिक पोषक तत्व उपलब्ध असतात. त्यामुळे अशा फळाचं सेवन साल न काढताच करणं जास्त फायदेशीर असतं
fruit skin benefits in marathi
fruit skin benefits in marathiEsakal
Updated on

Fruit Skin Benefits: शरीरासाठी गरजेची असलेली पोषक तत्व मिळवण्यासाठी जसं संतुलित आहार गरजेचा आहे. तसचं या आहारात फळांचा Fruits समावेश करणं हे अत्यंत गरजेचं आहे.

फळांच्या आणि खास करून मोसमी फळांच्या Seasonal Fruits सेवनामुळे शरीराला आवश्यक पोषक तत्वांची पूर्तता होते. शिवाय यामध्ये उपलब्ध असलेल्या अँटीऑक्सिडंट्समुळे आरोग्याच्या अनेक गंभीर समस्या सुटू शकतात. Why it is important to eat fruits without peeling skin

काही अभ्यासामधुन हे समोर आलं आहे की अनेक फळांच्या सालांमध्ये Fruit Skin अधिक पोषक तत्व उपलब्ध असतात. त्यामुळे अशा फळाचं सेवन साल न काढताच करणं जास्त फायदेशीर असतं.

ही फळं Fruits सोलून खाल्ल्याने पूर्ण पोषक तत्व शरीराला मिळत नाही. त्यामुळेच फळांचं सेवन करताना या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे.

आपण साधारण बाजारातून फळं आणल्यानंतर ती स्वच्छ धूवून ठेवतो. अनेकजण फ्रिजमध्ये फळं ठेवतात. त्यानंतर या फळांचं सेवन करतो.

मात्र फळांचं सेवन करताना ते योग्य प्रकारे आणि योग्य वेळी करणं गरजेचं असल्याचं तज्ञांचं म्हणणं आहे. तज्ञांच्या मते सुर्यास्तानंतर फळांचं सेवन टाळावं. यामुळे चयापचय क्रियेवर परिणाम होवू शकतो. 

कोणत्या फळाचं सालीसह सेवन केल्यास जास्त फायदेशीर ठरू शकतं हे पाहुयात. 

१. सफरचंद- दररोज एक सफरचंद खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होवून आजारांपासून दूर राहता येत असं डॉक्टर म्हणतात.

मात्र अनेकजण सफरचंदाची साल काढून त्याचं सेवन करतात. डॉक्टरांत्यामध्ये साल काढून सफरचंद खाणं हे चूकीचं आहे.

सफरचंदाच्या सालीमध्ये अनेक पोषक तत्व आढळतात. सालीसह सफरचंद खाल्ल्यास यातून ३३२ टक्के अधिक प्रमाणात विटामिन के, १४२ टक्के अधिक प्रमाणात विटामिन ए, ११५ टक्के अधिक विटामिन सी, २० टक्के कॅल्शियम आणि १९ अधिक प्रमाणा पोटॅशियम मिळतं. 

अनेकदा सफरचंद टिकून राहण्यासाठी त्यावर वॅक्स लावलं जातं. यामुळे अनेकजण साल काढून त्याचं सेवन करतात. यासाठी तुम्ही कोमट पाण्यात सफरचंद धुवून ते कोरड्या कपड्यांने चांगलं पुसून खावं. साल काढण्याची आवश्यकता नाही. 

हे देखिल वाचा

fruit skin benefits in marathi
Fruits Buying Tips : पपई वरून तर दिसतेय चांगली पण, चवीला कशी आहे कसं ओळखाल?

२. आंबा- फळांचा राजा आंबा हा देखील आरोग्यासाठी उपयुक्त आहे. कच्चा आंबा असो किंवा पिकलेला तो सालीसह खाणं आरोग्यासाठी जास्त लाभदायक आहे. आंब्याच्या सालीमध्ये मॅग्नेशियम, नॉरथिरियोल आणि रेस्वेराट्रोल सारखी उत्तम अँटीऑक्सिडंट्स उपलब्ध असतात.

ही अँटीऑक्सिडंट्स फुफ्फुस, कोलन, स्तन तसचं मणक्याच्या कॅन्सरसह इतर अनेक गंभीर आजारांचा धोका कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात. त्यामुळेच आंब्याच सेवन सालीसह करणं फायदेशीर ठरतं. 

३. काकडी- अनेकजण काकडीचं सेवन साल काढूनच करतात. मात्र काकडी खाण्याची ही अयोग्य पद्धत आहे. काकडी न सोलता खाल्ल्याने त्याचे आरोग्याला अधिक फायदे मिळतात. यामुळे काकडीत असलेलं विटामिन के, विटामिन सी यांसह अनेक मिनरल्स आणि विटामिन्स शरीराला मिळतात.

काकडीच्या सालीमध्ये अधुलनशील फायबर मोठ्या प्रमाणात असतं जे बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यास उपायकारक ठरतं. काकडीच्या सालामध्ये एस्कॉर्बिक ऍसिड (Ascorbic acid) उपलब्ध असतं.

हे ऍसिड त्वचेसाठी गुणकारी आहे. काकडीची साल हे विटामिन ए म्हणजेच बीटा-कॅरेटीनचा एक उत्तम स्रोत आहे. यामुळे तुमची दृष्टी चांगली राहण्यास मदत होते. 

fruit skin benefits in marathi
Summer Fruit: कोकणातील तोडगोळे मालेगावात दाखल! प्रथमच फळ विक्रीसाठी आल्याने बघणाऱ्यांसह खरेदीदारांची गर्दी

४. पेर- पेरच्या सालीमध्ये मुबलक प्रमाणात अँटीऑक्सिडंट उपलब्ध असतात. यामुळे ते आरोग्यासाठी फायदेशीर असताता. तसचं या सालीमध्ये मोठ्य़ा प्रमाणात जीवनसत्व  असल्याने पेर हे फळं कधीही सालीसह खावे.

५. पेरू- पेरुमध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्, मिनरल्स आणि जीवनसत्व आढळतात. पेरू प्रमाणेच पेरूच्या सालीतही ही जीवनसत्व आढळतात. साल काढून पेरू खाल्ल्यास ही जीवनसत्व शरीराला मिळणार नाहीत. यासाठी साल न काढता कधीही पेरुचं सेवन करावं. 

त्यामुळे इथून पुढे या फळांचं सेवन करताना ते सालीसह करा. मात्र ते खाण्यापूर्वी स्वच्छ धुवा आणि मगच या फळांचं सेवन करा. शिवाय फळं फ्रिजमध्ये ठेवून खाण्याएवजी ताजी फळं खाणं आरोग्यासाठी अधिक लाभदायक असतं. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()