Janam Kundali Wedding: लग्नाआधी एकमेकांची कुंडली जुळणं का आहे महत्त्वाचं? लग्न ठरण्यासाठी किती गुण आहेत आवश्यक

भारतात बहुतांश कुटुंबामध्ये पत्रिका पाहिल्याशिवाय मुलाचा असो वा मुलीचा विवाह केला जात नाही. एखाद्या मुलीली किंवा मुलाला स्थळ आले तर सर्वात प्रथम दोघांची पत्रिका जुळते का? असा सवाल उपस्थित करतात.
janam kundali wedding
janam kundali wedding
Updated on

भारतात बहुतांश कुटुंबामध्ये पत्रिका पाहिल्याशिवाय मुलाचा असो वा मुलीचा विवाह केला जात नाही. एखाद्या मुलीली किंवा मुलाला स्थळ आले तर सर्वात प्रथम दोघांची पत्रिका जुळते का? असा सवाल उपस्थित करतात. कुंडली जुळली तरच लग्न ठरवलं जातं आणि लग्नाची पुढील तयारी केली जाते. तसेच, यामध्ये मुलगा आणि मुलगी यांचे किती गुण मिळतात हे यावरही लग्न अवलंबून असते. तर जाणून घेऊयात लग्नापूर्वी पत्रिका का पाहिली जाते?

कोणत्याही व्यक्तीची जन्मकुंडली त्याची तारीख, वेळ आणि जन्म ठिकाणाच्या आधारे तयार केली जाते. लग्नासाठी वधू-वरांची कुंडली पाहून चंद्राचे गुण, स्थिती आणि मंगल दोष लक्षात येतो. लग्नासाठी कुंडली जुळवणे ही एक प्रक्रिया आहे ज्याद्वारे लग्नानंतर मुलगा आणि मुलगी यांचे वैवाहिक जीवन कसे असेल हे पाहिले जाते. दोघेही एकमेकांसाठी बनलेले आहेत की नाही तसेच, कुंडली किंवा गुण जुळण्यासाठी, जोडप्याच्या चंद्र ग्रहाची स्थिती विचारात घेतली जाते.

janam kundali wedding
Monsoon Body Detox : पावसाळ्यात शरीर डिटॉक्स करायचे आहे? मग, 'या' हेल्दी ड्रिंक्सचा आहारात करा समावेश

जन्मकुंडली जुळण्याला महत्त्व का?

लग्न हे एक असे बंधन आहे की जे दोन व्यक्तींना आयुष्यभर एकत्र ठेवते, अशा परिस्थितीत लग्नापूर्वी वधू-वरांच्या कुंडली आणि राशी जुळवून शोधून काढले जाते की लग्नानंतर दोघेही सुखी असतील की नाही, हे नातेसंबंध सफल होतील की नाही, संतती आहे की नाही, मांगलिक दोष आहे की नाही. अशा शंकांचे निरसन जन्मकुंडली द्वारे होते.

जन्मकुंडलीच्या माध्यमातून भविष्यात वैवाहिक जीवनात काही अडथळे येणार आहेत की नाही हे देखील पाहिले जाते. अडथळा असेल तर तो दूर कसा होणार? यामुळेच विवाह यशस्वी होण्यासाठी जन्मकुंडली जुळण्याला महत्त्व दिले जाते.

janam kundali wedding
Yogini Ekadashi 2024 : योगिनी एकादशीच्या निमित्ताने भगवान विष्णूंना दाखवा 'या' पदार्थांचा नैवेद्य, जाणून घ्या एकादशीचे महत्व

पत्रिकेसोबत दोघांचे गुणदेखील पाहतात तर का?

नातेसंबंध समीकरणामध्ये कुंडली जुळवताना विचारात घेतलेली प्रमुख गोष्ट म्हणजे गुण. एकंदरीत, वर वधूमधील सुसंगतता तपासण्यासाठी आठ पैलूंचा विचार करतो. याला गुणमिलन म्हणतात.

एकूण 36 गुण असतात. जर दोन कुंडलींमध्ये 18 किंवा त्याहून अधिक गुण एकमेकांशी जुळत असतील तर विवाह मान्य आहे. आता सुसंगतता तपासण्यासाठी आठ पैलू कुठले तर त्यात वर्ण , वश्य , तारा, योनी- ग्रह, मैत्री, गण, भकूट आणि नाडी असे असून त्यात 36 गुण असतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com