हवामान बदलले की आरोग्याशी संबंधित अनेक समस्या आपल्याला सतावू लागतात. हिवाळा सुरू झाल्यावर सांधेदुखीचा त्रासही वाढतो. विशेषतः, ही समस्या वृद्धांना खूप त्रास देते. थंडीच्या काळात, सांधे आणि स्नायू दुखणे कधीकधी तीव्र होते आणि औषधोपचार करूनही आराम मिळत नाही.
आजकाल खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे तरुणांनाही सांधेदुखीचा त्रास होत आहे. हिवाळ्यात सांधेदुखीचा जास्त त्रास का होतो आणि तो कसा दूर करता येईल हे जाणून घेऊया तज्ञांकडून.
हिवाळ्यात सांधेदुखी का वाढते?
हिवाळ्यात तापमानात घट झाल्यामुळे शरीरातील काही भागांमध्ये रक्तप्रवाह कमी होऊ लागतो. यामध्ये सांधे देखील समाविष्ट आहेत. यामुळे सांध्यांमध्ये जडपणा आणि वेदना होऊ शकतात.
हिवाळ्यात शारीरिक हालचाल कमी केल्यास स्नायू घट्ट होतात आणि सांधे दुखू शकतात.
व्हिटॅमिन डी हाडांच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे. हिवाळ्यात सूर्यप्रकाश न मिळाल्यानेही सांधेदुखी होऊ शकते.
हे उपाय ट्राय करा
सांध्यांवर जास्त दबाव न आणता हलका व्यायाम आणि योगासने करा. पोहणे, चालणे आणि योगासने सांधे लवचिकता राखतात.
सांधे झाकून ठेवा. हिवाळ्यात थंड हवेपासून सांध्यांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करा.
ओमेगा-३ फॅटी ऍसिडस्, अँटी-ऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन डी युक्त आहार घ्या. यामुळे जळजळ कमी होते.
तेलाने मसाज केल्यानेही सांधेदुखी कमी होण्यास मदत होते.
जर तुमचा त्रास अजूनही कमी होत नसेल तर नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.