General Knowledge : पाल सलग पळताना कधीच का दिसत नाही? थांबत थांबत का चालते?

आता ती आमच्याकडे एकटक पाहत आहे आणि आमच्यावर तुटून पडेल असं सगळ्यांनाच वाटत असेल.
 lizards
lizardsEsakal
Updated on

पालीचं नाव घेतलं की अनेकजण तोंडं वाकडी करतात. घराच्या भिंतीवर किंवा छतावर असलेल्या पाली पाहून अनेकदा आपल्याला अस्वस्थ होतं, भिती वाटते. पाली घराच्या कानाकोपऱ्यातले कीटक खातात, पण तरी त्या पाहून आपल्याला घृणा निर्माण होते.

पण तुम्ही कधी बारकाईने पाहिलं आहे का? पाल कधीच सरळ नुसती पळत नाही. ती थांबते, मग थोडावेळ चालते, पुन्हा थांबते. घराच्या भिंतीवर बसलेल्या पालीच्या हालचाली तुम्ही कधीतरी पाहिल्या असतीलच, मग ती कीटक पकडण्यासाठी वेगाने धावत येते आणि पकडते हे तुम्ही पाहिले असेलच, पण पाल वेगाने फिरते हे क्वचितच लक्षात आले असेल.

 lizards
Kulfi Recipe : कुल्फी हेल्दी असू शकते का? हो, पण जर 'या' पद्धतीने बनवली असेल तर...

हे पाहून लोक तिला घाबरतात, आता ती आमच्याकडे एकटक पाहत आहे आणि आमच्यावर तुटून पडेल असा सगळ्यांनाच वाटत असेल. वास्तविक, पालीच्या डोळ्यांवर पापण्या नसतात, त्यामुळे हा प्राणी आणखीनच भयानक दिसतो.

पाल खूप वेगाने धावते, परंतु ती सतत धावू शकत नाही, कारण तिला श्वास घेण्यासाठी थांबावे लागते. पाल एका वेळी फक्त एकच काम करू शकते, अशावेळी ती एकतर धावू शकते किंवा श्वास घेऊ शकते. त्यामुळे धावताना श्वास घेण्यासाठी तिला मध्येच थांबावे लागते.

 lizards
Tasty Milk Recipes: दूध पिण्यासाठी तुमची मुलं नाक मुरडतात, मग या टिप्सच्या मदतीने बनवा Tasty... मुलंदेखील होतील खुष

हेच कारण आहे की पाल आपल्या भक्ष्यावर खूप वेगाने झेपावते आणि भक्ष सोडून पळून गेला तर त्याचा पाठलाग करत नाही. पाली ३० वर्षांपर्यंत जगू शकतात. धोक्याची जाणीव झाली की ती आपली शेपटी शरीरापासून वेगळे करू शकते, परंतु नंतर तिची शेपटी पुन्हा वाढते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.