महात्मा गांधी १५ ऑगस्ट रोजी जल्लोषात सहभागी नव्हते, कारण...

...म्हणून १५ ऑगस्टच्या जल्लोषात महात्मा गांधीनी घेतला नाही सहभाग
Mahatma Gandhi
Mahatma Gandhi
Updated on

१५ ऑगस्ट,१९४७ हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आणि जल्लोषाचा दिवस आहे. या दिवशी आपला देश स्वतंत्र झाला. त्यामुळे दरवर्षी १५ ऑगस्टला देशात मोठा उत्साह पाहायला मिळतो. परंतु, आपण जो आनंद साजरा करतो, त्यासाठी अनेक देशप्रेमींनी प्राणांची आहुती दिली आहे. त्याकाळी देशप्रेमापोटी अनेकांनी स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतला होता. इतकंच नाही तर अनेकांनी आपल्या प्राणांचे बलिदानही दिले. त्याच सगळ्या वीरयोद्ध्यांमुळे आज आपण स्वातंत्र्य उपभोगत आहोत. लोकमान्य टिळक, आगरकर, पंडित जवाहरलाल नेहरु, महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल अशा अनेकांनी स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतला होता. विशेष म्हणजे त्यांच्या प्रयत्नांना यश आलं आणि १५ ऑगस्ट,१९४७ रोजी देशाला स्वातंत्र्य मिळालं. मात्र, या दिवशी अशा अनेक घटना घडल्या आहेत. त्याविषयी आपल्याला फारसं माहित नाही. परंतु, 'बीबीसी हिंदी'च्या वृत्तात या दिवशी घडलेल्या काही महत्त्वाच्या घडामोडींविषयी नमूद करण्यात आलं आहे. म्हणूनच, या घडामोडी कोणत्या ते पाहुयात. (Why mahatma gandhi did not participated in the event of Independence Day)

१. महात्मा गांधी यांनी खरं तर स्वातंत्र्य चळवळीचं नेतृत्व केलं होतं. परंतु, देश स्वतंत्र होत असताना ते या प्रसंगी उपस्थित नव्हते. यावेळी ते दिल्लीपासून हजारो किलोमीटर दूर बंगालमधील नोआखली येथे उपोषण करत होते. त्यावेळी बंगाल, नोआखली येथे हिंदू-मुस्लीम वाद सुरु होता. त्यामुळेच हा वाद मिटवण्यासाठी म. गांधी या ठिकाणी उपोषणाला बसले होते.

२. १५ ऑगस्ट रोजी देशाला स्वातंत्र्य मिळणार असल्यामुळे पंडित जवाहरलाल नेहरु आणि सरदार वल्लभभाई पटेल यांनी म. गांधींना पत्र पाठवून या दिवशी दिल्लीत येण्याची विनंती केली होती. आपला स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट रोजी साजरा होणार आहे. तुम्ही राष्ट्रपिता आहात. त्यामुळे या मंगलप्रसंगी उपस्थित राहून तुमचे आशीर्वाद मिळावेत अशी इच्छा आहे, असं या पत्रात नमूद करण्यात आलं होतं.

Mahatma Gandhi
Independence Day: हटके ड्रेसिंग करा अन् स्वातंत्र्य दिनाचा घ्या फील

३. पंडित जवाहरलाल नेहरु आणि सरदार वल्लभभाई पटेल यांचं पत्र मिळाल्यावर म. गांधींनी तात्काळ त्यांना उत्तर पाठवलं होतं. मात्र, यावेळी स्वातंत्र्यदिनी उपस्थित राहता येणार नाही असं म. गांधींनी सांगितलं होतं. कलकत्तामध्ये हिंदू-मुस्लीम एकमेकांच्या जीवावर उठले असताना मी आनंदसोहळ्यात कसा काय सहभागी होऊ? येथील वाद, दंगे मिटवण्यासाठी मी माझे प्राणदेखील पणाला लावेन.

४.जवाहरलाल नेहरू यांनी ऐतिहासिक भाषण 'ट्रिस्ट विद डेस्टनी' १४ ऑगस्टच्या दिवशी मध्यरात्री Viceregal Lodge (सध्याचे राष्ट्रपती भवन) येथे दिलं होतं. त्यावेळी नेहरु पंतप्रधान झाले नव्हते. विशेष म्हणजे त्यांचं हे भाषण देशातील प्रत्येक व्यक्तीने ऐकलं होतं. मात्र, केवळ महात्मा गांधींनी ऐकलं नव्हतं. त्यावेळी ते रात्री ९ वाजताच झोपी गेले होते.

५. १५ ऑगस्ट ,१९४७ रोजी लुई माउण्टबेटेन आपल्या कार्यालयात काम करत होते. यावेळी नेहरुंनी त्यांच्याकडे आपल्या मंत्रिमंडळाची यादी सुपूर्त केली आणि इंडिया गेटजवळ प्रिंसेज गार्डन येथे एका सभेत जनतेला संबोधित केलं.

६. स्वातंत्र्यदिनाच्या वेळी देशाचे पंतप्रधान लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकवतात. परंतु, १५ ऑगस्ट १९४७ रोजी असं झालं नाही. त्याऐवजी लोकसभा सचिवालयातील शोध पत्रानुसार, पंडित नेहरुंनी १६ ऑगस्ट, १९४७ रोजी लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकवला.

7. १५ ऑगस्टच्या दिवसापर्यंत भारत-पाकिस्तान विभागणीची सीमारेषा निश्चित करण्यात आली नव्हती. हा निर्णय १७ ऑगस्ट रोजी रेडक्लिफ लाइनच्या घोषणेनंतर घेण्यात आला.

८. १५ ऑगस्ट रोजी देश स्वतंत्र तर झाला. मात्र, त्यावेळी आपल्याकडे कोणतंही राष्ट्रगीत नव्हतं. त्यावेळी रवींद्रनाथ टागोर यांचं जन-गण-मन हे राष्ट्रगीत करण्याचं ठरविण्यात आलं. विशेष म्हणजे टागोरांनी हे गीत १९११ मध्ये लिहिलेलं होतं. त्यानंतर १९५० मध्ये त्याला राष्ट्रगीताचा सन्मान मिळाला.

९. १५ ऑगस्ट रोजी भारतासह द. कोरिया, बहरीन आणि कांगो हे देश स्वतंत्र झाले. १५ ऑगस्ट १९४५ रोजी जपानपासून द. कोरिया स्वतंत्र झाला. ब्रिटनपासून बहरीन १५ ऑगस्ट १९७१ रोजी स्वतंत्र झाला. तर फ्रान्सपासून कांगो १५ ऑगस्ट,१९६० ला स्वतंत्र झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.