भारतीय संस्कृतीमध्ये विवाहसंस्थेला मोठं महत्त्व आहे. त्यामुळे लग्न झाल्यानंतर कोणत्याही कायदेशीर बाबींमध्ये अडथळा निर्माण होऊ नये यासाठी विवाह नोंदणी प्रमाणपत्र (Marriage Certificate) घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून तृणमूल काँग्रेसच्या खासदार (TMC MP) आणि बंगाली अभिनेत्री नुसरत जहाँ आणि त्यांचे पती निखिल जैन यांच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगली आहे. त्यांचा हा मुद्दा चर्चेत असतानाच अनेकांनी देशातील विवाह नोंदणी कायद्यावरदेखील (Marriage Registration Act) चर्चा करण्यास सुरुवात केली आहे. म्हणूनच, लग्नानंतर विवाह नोंदणी प्रमाणपत्र घेणं गरजेचं का आहे किंवा ते घेण्यासाठी काय करावं लागतं हे सविस्तरपणे जाणून घेऊयात.(why-marriage-certificate-is-important-and-how-to-to-register-a-marriage)
विवाह नोंदणी प्रमाणपत्र का आहे गरजेचं?
आपलं लग्न कायदेशीररित्या झालं आहे हे सांगणारा पुरावा म्हणजे विवाह नोंदणी प्रमाणपत्र. देशात विवाह नोंदणीसाठी दोन कायदे आहेत. पहिला हिंदू विवाह कायदा (Hindu Marriage Act-1955) आणि दुसरा विशेष विवाह कायदा (1954). हिंदू विवाह कायद्यांतर्गत, दोन्ही पक्ष अविवाहित किंवा घटस्फोटित असतील. किंवा, पहिल्या लग्नातील जोडीदार हयात नसेल तर दुसरं लग्न केलं जाऊ शकतं. या कायद्यांमुळे लग्नाला कायदेशीर मान्यता मिळते व दोघांवरही एकमेकांच्या काही कायदेशीर जबाबदाऱ्या आहेत हे स्पष्ट होतं. स्त्रियांनी त्यांचे हक्क मिळवून देण्याच्या उद्देशाने २००६ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने लग्न प्रमाणपत्र बनवण्याचा निर्णय घेतला.
नोंदणी नसेल तर लग्न अवैध ठरतं का?
जर एखाद्या व्यक्तीने लग्नाची नोंदणी केली नसेल तर ते लग्न अवैध ठरतं का असा प्रश्न अनेकांना पडतो. मात्र, असं काहीच नाही. जर लग्नाची नोंदणी नसेल. पण, सामाजिक पुरावे असतील तर ते लग्न वैध मानलं जातं. मात्र, विवाह नोंदणी प्रमाणपत्र अनेक कायदेशीर बाबींमध्ये उपयोगी पडतं. उदा. घटस्फोटावेळी मुलांचा ताबा मिळवणं, बँकेतील नॉमिनेशन, वासरा हक्काचं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी या नोंदणी प्रमाणपत्राचा फायदा होतो.
विवाह नोंदणीसाठी कुठे अर्ज करावा?
लग्नानंतर ज्या ठिकाणी जोडप वास्तव्यास आहे त्या क्षेत्रातील दंडाधिकाऱ्यांच्या कार्यालयात जाऊन हा अर्ज करता येतो. ऑनलाइन व ऑफलाइन अशा दोन्ही स्वरुपात नोंदणी करता येते. तसंच प्रमाणपत्र १५ दिवसामध्ये मिळतं.
पासपोर्टसाठी प्रमाणपत्राची आवश्यकता नाही
पासपोर्टच्या नव्या २०१८च्या नियमानुसार, पासपोर्ट करताना विवाह प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसंच हे प्रमाणपत्र तयार करण्यासाठी केवळ १००रुपयांचा खर्च येतो. तर, विशेष विवाह कायद्यात ही फी १५० रुपये आहे. तसंच अर्जासह जमा कराव्या लागणाऱ्या प्रतिज्ञापत्रासाठी साधारणपणे ५०० रुपयांचा खर्च येतो.
दरम्यान,गेल्या काही दिवसांपासून तृणमूल काँग्रेसच्या खासदार (TMC MP) आणि बंगाली अभिनेत्री नुसरत जहाँ आणि त्यांचे पती निखिल जैन यांच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगली आहे. तुर्कस्तानमध्ये लग्न केल्यामुळे भारतात ते वैध नसल्याने त्यांना घटस्फोटाची (Divorce) आवश्यकता नाही, असं मत त्यांनी मांडलं होतं. परंतु, त्यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर देशातील विवाह नोंदणी कायद्यावर (Marriage Registration Act) चर्चा सुरू झाल्याचं पाहायला मिळालं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.