Gardening Tips : आपल्या आसपास अनेक प्रकारची झाडे असतात. ही झाडे मस्त हिरवीगार आणि टवटवीत दिसल्यावर आपल्याला छान वाटते. मात्र, जेव्हा झाडांची पाने पिवळी पडू लागतात किंवा झाडांचे पाने कोमेजू लागतात, तेव्हा मात्र, हे चित्र चांगले दिसत नाही.
परंतु, झाडांची पाने पिवळी का पडतात? यामागची कारणे जर आपण शोधून काढली तर आपण झाडांची पाने पिवळी पडण्यापासून त्यांचा बचाव करू शकतो. जर तुमच्या झाडांची पाने देखील पिवळी पडत असतील तर सर्वात आधी त्यामागची कारणे जाणून घेणे महत्वाचे आहे. आज आपण झाडांची पाने पिवळी पडण्यामागची कारणे कोणती? त्याबद्दल जाणून घेणार आहोत.
वनस्पतींसाठी आवश्यक असणारी पोषणद्रव्ये मातीतून मिळतात, हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. मात्र, यासोबतच पाणी देखील झाडांसाठी आवश्यक आहे. परंतु, जर झाडांची पाने पिवळी पडत असतील तर त्यामागे पोषणतत्वांची कमतरता असू शकते.
जर झाडांची जुनी पाने पिवळी पडत असतील आणि नवीन पाने हलक्या हिरव्या रंगाची येत असतील तर हे नायट्रोजनच्या कमतरतेचे लक्षण असू शकते.
आसपासच्या हवेचा देखील झाडांवर खोलवर परिणाम होतो. जर तुम्ही एखादे झाड कुंडीत लावून ती कुंडी घरात ठेवली असेल तर घरातील हवेचा देखील झाडाच्या आरोग्यावर परिणाम होतो.
जर ही हवा कोरडी असेल तर त्या कोरड्या हवेमुळे झाडांना लवकर कीड लागू शकते. या कारणामुळेच झाडांमध्ये स्पायडर माईट्सची कीड लागते आणि हे कीडे पानांचा रस शोषून घेतात, त्यामुळे, झाडांची पाने पिवळी पडतात.
सूर्यप्रकाशामुळे झाडांची चांगली वाढ होण्यास मदत होते. सूर्यप्रकाशाची कमतरता असेल तर झाडांची पुरेशी वाढ होत नाही. तसेच, अपुऱ्या सूर्यप्रकाशामुळे झाडांची पाने पिवळी पडतात. त्यामुळे, रोज ४-५ तास तरी किमान तुमची झाडे सूर्यप्रकाशामध्ये ठेवा. अन्यथा झाडांची पाने पिवळी पडतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.