आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांच्या मृतदेहाचं आज शवविच्छेदन पार पडणार आहे. त्यानंतर त्यांचा मृतदेह आप्तेष्टांकडे सोपवण्यात येईल. आज दुपारी पोस्टमॉर्टेमनंतर गिरी यांच्या मृतदेहाला भूसमाधी दिली जाणार आहे. हिंदू धर्मामध्ये अंत्य संस्कार करताना लोकांचे दहन केले जाते. मग, नरेंद्र गिरी यांना दफन का करण्यात येत आहे हे जाणून घेऊ या...
साधूंना पवित्र आत्मा मानले जाते. हिंदू धर्म माननरे लोक आत्माच्या अस्तिवावरही विश्वास ठेवतात. मृत्यूनंतर तो आत्मा स्थानांतरीत होतो असेही मानले जाते. पुनर्जन्म तेव्हाच होतो जेव्हा आत्मा कोणतीही व्यक्ती जीवनचक्रादरम्यान सर्व बंधनातूनक मुक्तो होतो असे मानले जाते.
मृत्यूनंतर शरीर नष्ट होते पण आत्मा तोपर्यंत बंधनात अडतून राहतो जोपर्यंत तो नश्वर अवशेष भौतिकरूपात उपलब्ध असतात. हिंदू मान्यतेनुसार शरीराचे अंतिम संस्कार केल्यामुळे संसारिक बंधन संपतात. त्यामुळे आत्माला संसारिक गरजांमधून तो मुक्त होणाचा मार्ग मिळतो.
एक संन्यासी सर्व संसारिक बंधनाचा आणि सुखांचा त्याग करुन संत बनतात. अशा व्यक्तीचा जेव्हा मृत्यू होतो तेव्हा असे मानले जातेकी संन्यासी भौतिक शरिर सोडून देतात आणि मृत्यूनंतर कपाळ मोक्षद्वारे अमरता प्राप्त करतात. साधू-संताचे प्राण एका दिव्य मार्गाद्वारे शरिर सोडून देतात असे मानले जाते.
साधू आणि संताबाबत अशी मान्यता आहे की भौतिक शरीर कित्येक बंधनातून मुक्त होते. अशावेळी दहन संस्कारशिवायच त्यांची आत्म्याला मुक्ती प्राप्त होते.
(वरील लेखातून कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा पसरवण्याचा सकाळ मध्यम समूहाचा उद्देश नाही)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.