Jaggery: दिवाळीत गुळाचे सेवन का करावे, आयुर्वेद काय सांगतं?

गूळ शरीराला डिटॉक्स करण्यासाठी ओळखला जातो, असे आयुर्वेदात सांगितले आहे.
Jaggery
Jaggerysakal
Updated on

गूळ खाण्याचे फायदे तुम्ही अनेकदा ऐकले असतील. पण दिवाळीत गूळ खाण्याला विशेष महत्त्व आहे. दिवाळीत मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते. त्यामुळे सामान्य लोकांना त्रास सहन करावा लागतो. या दिवसात थंडीही असल्याने हा त्रास अधीकच वाढतो.

लोकांना श्वसनाचे आजार होतात. ज्यांना दमा असतो अशांना तर घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला जातो. यावर एक गुणकारी उपाय आयुर्वेदात सांगण्यात आला आहे. आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. अबरार मुल्तानी यांनी याबद्दल माहिती दिली आहे.

Jaggery
jaggery : गूळ खाल्ल्याने मिळतील हे आरोग्यविषयक फायदे

गूळ शरीराला डिटॉक्स करण्यासाठी ओळखला जातो, असे आयुर्वेदात सांगितले आहे. शरीरातील प्रदूषीत कण आणि विषारी घटक काढून टाकण्यास तो मदत करतो. प्रदुषणाचा त्रास होऊ नये यासाठी तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यासोबत गुळाचे सेवन करा, असे डॉ. मुल्तानी यांनी सांगितले.

दमा आणि श्वसनाच्या आजारांच्या रुग्णांसाठी गुळाचे सेवन अत्यंत फायदेशीर असल्याचे सांगितले आहे. घरच्या मुलांनाही थोडा गूळ खाऊ घालू शकता, असा सल्लाही त्यांनी दिला.

Jaggery
Ayurveda: आयुर्वेदानुसार अन्न आणि भावना यांत नेमका काय संबंध आहे?

गुळामध्ये अँटी-एलर्जिक गुणधर्म असतात. जे शरीरातील अॅलर्जीची समस्या दूर करतात. दिवाळीत होणाऱ्या प्रदुषणामुळे दम्याचा अधिक त्रास होऊ शकतो. त्यावर गुळ हा चमत्कारीक औषधाप्रमाणे काम करते. दमा हा एक प्रकारची ऍलर्जी आहे. वाढलेल्या प्रदूषणामुळे तो अधिक त्रायदायक ठरू शकतो. त्यामुळे अस्थमाच्या रुग्णांनी दिवाळीत रोज गुळाचे सेवन करावे.

गूळ खाल्ल्याने श्वसन मार्गाचे स्नायू आणि फुफ्फुसांना आराम मिळतो. त्यामुळे थंडीतही शरीर गरम राहते. गुळ खोकला आणि सर्दीसाठी हे सर्वोत्तम औषध मानले गेले आहे. खोकला-सर्दीच्या रुग्णांनी मळमळ टाळण्यासाठी कोमट पाण्यासोबत गुळाचे सेवन केल्यास फरक पडेल, असे डॉ. अबरार यांनी सांगितले.

Jaggery
Health: स्टाईलच्या नादात जीव गमावून बसाल! कुरळ्या केसांना स्ट्रेट करणं पडू शकतं महागात

गूळ शरीर उबदार ठेवतो

हिवाळ्यात थंडीचे प्रमाण वाढते, त्यामुळे लहान मुले व वृद्ध लोक तसेच रक्तदाब कमी असलेल्या रुग्णांना थंडी जास्त जाणवते. यावेळी गूळ खाल्ल्याने शरीरात रक्ताचा पुरवठा सुरळीत होऊन ब्लड सर्कुलेशन सुधारते. असे झाल्याने थंडीच्या दिवसात शरीर उबदार राहण्यास मदत होते.

कपालभारतीचा सराव

दिवाळीतील प्रदूषण टाळण्यासाठी गुळाव्यतिरिक्त दोन आयुर्वेदिक गोष्टी करणे आवश्यक आहे. ज्यामुळे तुम्हाला मोकळा श्वास घेता येईल. आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे तुम्ही जल नेती क्रिया आणि कपालभारतीचा सराव करावा, असेही डॉ. अबरार यांनी सांगितले.

कोणी गूळ खाऊ नये

शुगर आणि पित्तदोष असलेल्या रुग्णांनी गूळ खाऊ नये. या लोकांव्यतिरिक्त सर्वजण रोज गुळाचे सेवन करू शकतात. रात्रीच्या जेवणानंतर कोमट दुध आणि गूळ खाण्याचा सल्ला डॉ. मुल्तानी यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.