Monsoon: पावसाळ्यात दही का खाऊ नये? जाणून घ्या काय म्हणतात तज्ञ

पावसाळ्यात दही खाऊ नये असे अनेकांना बोलताना ऐकले आहे का?
curd
curdsakal
Updated on

पावसाळ्यात आरोग्याची अधिक काळजी घेण्याची गरज आहे. हे हवामान जरी उष्णतेपासून दिलासा देण्याचे काम करते. पण सोबत अनेक आजारही घेऊन येतात. बदलत्या ऋतूमध्ये आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. म्हणूनच निरोगी जीवनशैली पाळली पाहिजे. खाण्यापिण्याची अधिक काळजी घेण्याची गरज आहे. परंतु आयुर्वेद तज्ज्ञांच्या मते पावसाळ्यात दही खाणे आरोग्यासाठी चांगले नाही.

ते खाल्ल्याने आरोग्यास हानी होऊ शकते. पण तुम्हाला माहीत आहे का या ऋतूत दही का खाऊ नये. या ऋतूत दही खाल्ल्याने आरोग्याला कोणते नुकसान होते. यावर आयुर्वेद तज्ञ काय म्हणतात ते जाणून घेऊया.

curd
National Doctors Day 2023: राष्ट्रीय डॉक्टर्स डे यावेळी कोणत्या थीमसह साजरा केला जातोय? जाणून घ्या

दिल्ली एमसीडीचे आयुर्वेदिक अधिकारी डॉ आर पी पाराशर यांच्या मते, यामुळे फोड आणि पिंपल्ससारख्या त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात. याशिवाय त्वचेवर खाज येण्याची समस्या होऊ शकते. म्हणूनच या ऋतूत दही खाणे टाळावे. यासोबतच या ऋतूत दही खाल्ल्याने फंगल इन्फेक्शनची समस्याही वाढते. त्यामुळे पावसाळ्यात दही खाणे टाळावे.

पचन समस्या

या ऋतूत दही खाल्ल्याने मेटाबॉलिज्म बिघडते. तुम्हाला पचनाशी संबंधित समस्या होऊ शकतात. त्यामुळे अॅसिडीटी आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. यामुळे, पोटात संसर्ग होण्याचा धोका वाढतो. म्हणूनच या ऋतूत दही खाणे टाळावे.

दही खाल्ल्याने तुमची पचनशक्ती कमजोर होते. पावसाळ्यात दही खाल्ल्याने खोकला आणि सर्दी होऊ शकते. ताप देखील होऊ शकतो. ज्या लोकांना फुफ्फुसाची समस्या आहे. दही खाल्ल्याने त्यांचा त्रास आणखी वाढू शकतो. म्हणूनच ते खाणे टाळावे.

curd
National Doctor's Day : चौदा वर्षांची प्रतीक्षा संपली.. पुण्यात आयुर्वेदाने केली वंध्यत्वावर मात

हाडांच्या समस्या

दिल्लीतील आयुर्वेदाचार्य डॉ.भारत भूषण यांच्या मते, या ऋतूत दही खाल्ल्याने हाडांशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. दही खाल्ल्याने सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो. यामुळे सांधेदुखीपासून आराम मिळतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()