Makeup Tips: मेकअपमुळे तुम्हाला तुमचे दोष झाकण्यात मदत होते आणि तुम्हाला स्वतःबद्दल पूर्ण आत्मविश्वास वाटतो. रेग्युलर मेकअपबद्दल (Makeup) आपण सर्वजण जाणून आहोत, परंतु 'एचडी मेकअप' (HD Makeup) म्हणजे काय हे बहुतेकांना माहीत नाही.
हाय-डेफिनिशन कॅमेऱ्यांमुळे सर्व मेकअप कलाकारांना (Makeup Artist) प्रचंड जागरूक राहावं लागत आहे. कारण हाय-डेफिनिशन कॅमेऱ्यातील लेन्स सुरकुत्या (Wrinkles), डाग (blemishes) आणि चट्टे (scars) सहजतेने कॅप्चर करतात. एचडी किंवा हाय डेफिनिशन मेकअपची (High Definition Makeup) संकल्पना अस्तित्वात आली ती यामुळेच. या प्रकारचा मेकअप सहसा निर्दोष आणि नैसर्गिक लुक(Natural Look) देतो.
मेकअपसाठी वापरल्या जाणाऱ्या उत्पादनांतील फरक हाच रेग्युलर आणि एचडी मेकअपमधील फरक आहे. एचडी मेकअप करताना वापरलेली उत्पादने उच्च श्रेणीची असतात. ती टेक्सचरमध्ये (skin texture) हलकी असतात परंतु अधिक चांगले कव्हरेज देतात. त्यामुळे कॅमेरावर चेहऱ्यावरील डाग दिसत नाहीत. हा मेकअप चेहऱ्याशी मॅच होतो. त्यामुळे नियमितपणे मेकअप केल्यावरही दिसणारे चट्टे एचडी मेकअपने दिसत नाहीत. शिवाय हा मेकअप अनैसर्गिक किंवा बनावट दिसत नाही.
एचडी मेकअप हा ब्रश आणि ब्लेंडिंग स्पंज वापरून केला जातो. त्यांची रचना अशा प्रकारे केली जाते की, त्वचेवर पडणारा प्रकाश विखुरला जातो. त्यामुळे गुळगुळीत आणि मऊ लुक येतो. नैसर्गिक, एकसारखी आणि निर्दोष दिसणारी त्वचा मिळविण्यासाठी उत्पादनांचे उत्तम प्रकारे मिश्रण करणे ही येथे मुख्य गोष्ट आहे.
HD चित्रीकरणासाठी डिझाइन केलेले फाउंडेशन किंवा कन्सीलर वापरण्याचा विचार करा. त्याचा आपल्या दिसण्यावर प्रभाव दिसून येतो. शिवाय तुमच्या त्वचेच्या टोनवर लक्ष केंद्रित केल्यामुळे तुम्हाला जास्त मेकअपची गरज लागणार नाही.
कोणत्याही मेकअप ऍप्लिकेशनसाठी एक प्रो टीप आहे, ती म्हणजे सर्व काही व्यवस्थित मिसळलं असल्याची खात्री करा. तुमचा चेहरा, तुमची मान आणि तुमचे हात आणि पाय यांच्यामध्ये अंतर दिसू नये. तुमच्या पापण्यांवर कोणतीही तीक्ष्ण रेषा नसावी. तुमची लिपस्टिक देखील स्मूथ दिसली पाहिजे. मेकअप अपूर्ण राहिल्यास 4K कॅमेरा ते अगदी सहजपणे पकडेल. म्हणून तुम्हाला शक्य तितके अचूक मिश्रण करावे आणि हे करण्याचा योग्य मार्ग म्हणजे तुमच्या त्वचेशी जुळणारी फाउंडेशनची योग्य छटा शोधणे आणि त्याला अगदी व्यवस्थितपणे अप्लाय करणं.
एचडी मेकअप फायदेशीर आहे कारण तो तुमच्या त्वचेवर दिसणारे सर्व दोष लपविण्यास मदत करतो आणि तुम्हाला नैसर्गिक, नॉन-ड्रामॅटिक लुक देतो. हे सहसा व्यावसायिक मॉडेल्स आणि कलाकारांद्वारे पसंत केले जाते. मेकअप स्मूथ (Smooth Makeup) असल्यास फोटोमध्येही ती चमक जाणवेल आणि तुमचा चेहरा सुंदर दिसेल.(You will look beautiful after HD makeup)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.