Honeymoon : लग्नानंतर हनीमून का असतो? हनीमूनचा खरा अर्थ काय?

त्यामुळेच या कालावधीत लोक हनिमूनला जातात.
Honeymoon
Honeymoonsakal
Updated on

Honeymoon : साधारणत:  लग्नानंतरचा काही काळ जोडपे एकमेकांसोबत घालवतात याला हनीमून काळ म्हणतात. हनीमून काळात कपल्स एकत्रित वेळ घालवतात. अनेकदा हनीमून म्हटलं की नव्या जोडप्याने बाहेर फिरायला जाणे, असं समजलं जातं पण खरंच हनीमूनचा खरा अर्थ काय? आणि लग्नानंतरच हनीमून का असतो?

आज आपण या विषयीच सविस्तर जाणून घेणार आहोत. (why there is Honeymoon after marriage and what is the meaning of Honeymoon)

हनीमुनचा खरा अर्थ काय?

हनीमुन हा शब्द  Hony Moone या जुन्या इंग्रजी शब्दांवरून घेण्यात आलाय. Hony म्हणजे आनंद किंवा नवरा-बायकोच्या नात्यातील गोडवा या अर्थाने वापरला जातो. सोबत युरोपमध्ये नव्या जोडप्यांना मध आणि पाणी मिक्स करुन एक ड्रिंक दिले जाते. यावरुन हा हनी शब्द घेण्यात आलाय.

मून हा शब्द काळाशी निगडीत आहे. त्यामुळे मून म्हणजे काळ आणि हनीमून म्हणजे नवरा-बायकोच्या नात्यातील गोडवा जपणारा काळ संबोधले जाते. लग्नानंतर साधारण १५ दिवसांचा हनीमुन पिरेड असतो. त्यामुळेच या कालावधीत लोक हनिमूनला जातात.

Honeymoon
Honeymoon Locations : उन्हाळ्यातील हनिमूनसाठी स्वस्तात मस्त ठिकाणे

लग्नानंतर हनीमून का असतो?

लग्नानंतर नवरा बायकोने एकत्रित घालवलेला काळ म्हणजे हनीमून असतो. हनीमुन मुळात नव्या जोडप्याला एकत्रित एकटं घालवण्याचा काळ असतो. या हनीमून काळात जोडपे एकमेकांना समजून घेऊ शकतात. एकमेकांना ओळखू शकतात. नवे नाते सुरू करताना एकमेकांमध्ये चांगली घट्ट मैत्री व्हावी, या हेतूने हनीमून लग्नानंतर असतो. हनीमूनमुळे नवरा बायकोच्या नात्यातील गोडवा वाढतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.