Pickles And Pregnancy : गर्भावस्थेत आंबटचिंबट खाण्याची क्रेवींग का होते? हे आहे कारण

महिलांना गर्भावस्थेत आंबटचिंबट खाण्याची इच्छा का होते जाणून घेऊया
Pickles And Pregnancy
Pickles And Pregnancyesakal
Updated on

Pickles And Pregnancy : गर्भावस्थेत महिलांमध्ये अनेक प्रकारचे शारीरिक आणि मानसिक बदल होत असतात. ज्याचा थेट परिणाम त्यांच्या आवडीवर होत असतो. खरं तर गर्भावस्थेत महिलांना अनेक पदार्थ खाण्याची क्रेविंग होत असते. मात्र सगळ्यात जास्त इच्छा ही आंबटचिंबट खाण्याची होत असते. चला तर जाणून घेऊया महिलांना गर्भावस्थेत आंबटचिंबट खाण्याची इच्छा का होते ते.

या कारणाने महिलांना आंबट पदार्थांची क्रेवींग होते

गर्भावस्थेत शरीरात होणाऱ्या हॉर्मोनल बदलांमुळे महिलांना खरं तर आंबट खाण्याची इच्छा होते. ज्यामुळे महिलांना लोणच्यापासून ते आंबट चिंचापर्यंतची क्रेवींग होते. गर्भावस्थेत महिलांच्या शरीरातील सोडियम लो होतं त्यामुळे त्यांना आंबट खाण्याची क्रेवींग होते. अनेक महिलांना तर कच्च्या कैरीचा सुगंधही त्यांच्याकडे आकर्षित करतो.

प्रेग्नेंसीमध्ये आंबट खाण्याचे फायदे

रोगप्रतिकारशक्ती वाढते

आंबट पदार्थांमध्ये विटामिन सी ची मात्रा भरपूर असते. त्यामुळे महिलांची रोगप्रतिकारशक्ती वाढते. आंबट पदार्थ जसे क लिंबू, कच्ची कैरी, आवळा महिलांची प्रतिकारशक्ती वाढवतात. मात्र आंबट पदार्थांची क्रेवींग झाल्यास एक गोष्ट मात्र लक्षात घ्या की क्रेवींग झाल्यास फार प्रमाणात लोणचं किंवा इतर पदार्त खाऊ नका. विकतचं लोणचं खाण्याऐवजी घरचं लोणचं खा.

Pickles And Pregnancy
Trans Man Pregnant : ट्रान्सजेंडर पुरुषाला गर्भधारणा! भारतातील पहिलीच घटना

पचनशक्ती चांगली राहाते

लोणचं बनवताना त्यात अनेक प्रकारच्या मसाल्यांचा वापर केला जातो. जसे की मोहरी, जिरे, हींग, सोफ ज्यामुळे गॅसची समस्या दूर होते. लोणच्यात असलेले बॅक्टेरियी शरीरात गुड बॅक्टेरीया वाढवण्यात मदत करतात. याने पचनशक्ती सुधारते. अपचन आण जळजळ होण्यची समस्याही दूर होते.

अॅनिमियाची समस्या दूर होते

बहुतेक भारतीय महिलांमध्ये अॅनिमियाची समस्या असते. अशात काही एक्सपर्टचं असं म्हणणं आहे की प्रेग्नेंसीमध्ये आंबट खाल्ल्याने अॅनिमियाची समस्या दूर होते. चिंचेत असेलेल कॅल्शियम, आयरन, मॅग्नेशियम, प्रोटीन आणि झिंकसारखे मायक्रोन्यूट्रिएंट्स हड्ड्या आणि दातांना मजबूत ठेवण्यासोबतच शरीरात आयरनची मात्राही वाढवते.

Pickles And Pregnancy
Pregnant Women : गरोदर महिलांना कधीच विचारू नयेत हे प्रश्न

कफची समस्याही दूर होते

गर्भावस्थेत महिला चिंचेचं सेवन करत असेल तर त्यांना कफच्या समस्येपासून सुटका मिळते.

लोणचं खाताना या गोष्टींची विशेष काळजी घ्या

गर्भावस्थेत महिलांनी लोणच्याचं सेवन अगदी मोजक्या प्रमाणात करावं. लोणच्यात मिठाचं प्रमाण जास्त असल्याने तुमची ब्लड प्रेशरची समस्या वाढू शकते. डाएटमध्ये कुठल्याही लोणच्याचा समावेश करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.