आम्हाला मुलबाळ नकोच... का म्हणतात महिला असं!

एका आकडेवारीनुसार भारतातील १८.५ टक्के विवाहित महिलांना मुलबाळ नाही
Childfree Womens
Childfree Womens
Updated on

लग्न हा जसा प्रत्येकाच्या आयुष्यासाठी महत्वाचा निर्णय असतो. तसाच मूल कधी व्हावं, किती मुलं व्हावीत की होऊ नयेत हेही महत्वाचे निर्णय असतात.लग्नानंतर मुलं होणं हा वंश (Family) पुढे नेण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा टप्पा असतो. पूर्वीच्या काळी मुलं किती व्हावीत यावर बंधन नसायचेच. फार विचारही केला जात नसे. किंबहुना किती मुलं असावीत हा निर्णय घेण्याचा अधिकार महिलांकडे (Womens) नसायचाच. ग्रामीण भागात आजही काही प्रमाणात अशीच परिस्थिती आहे.

Childfree Womens
एकला चलो रे... लग्न न करता सिंगल राहण्याकडे तरुणाईचा वाढला कल

पण काळ बदलला आहे. लोकं शिकायला नोकरी करायला लागली आहे. त्यामुळे मुलं- मुली दोघेही आर्थिक, शारीरिक कुवत लक्षात घेऊन अपत्य कधी हवं याचा विचार करतात. काहीजण तर लग्नाला ५ वर्ष झाल्यावर सर्वबाजूने सक्षम असल्याचा विचार करून अपत्य व्हावं असा निर्णय घेतात. पण आता परिस्थिती आणखी बदलली आहे. आता लग्नानंतर नवरा बायकोला मुलबाळ (Kids) नको असे वाटते. त्यात महिलांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे. महत्वाचे म्हणजे एका आकडेवारीनुसार भारतातील १८.५ टक्के विवाहित महिलांना मुलबाळ नाही. याच तरुण वयातल्या महिलांची संख्या मोठी आहे. पण अनेक महिलांना सध्या अपत्य नको आहे.

Childfree Womens
घटस्फोटानंतर ७२ टक्के स्त्रिया ऑनलाईन डेटींगसाठी तयार ! सर्वेक्षणात स्पष्ट

काय म्हणतात childfree महिला

- सध्या जगातली परिस्थिती बघता वातावरणातला बदल, महामारीसारख्या समस्या अशा आरोग्याच्या समस्यांबरोबरच पर्यावरणाचे परीणामही भीषण आहेत. त्यामुळे मुलांना जन्म देऊन त्यांना दु:ख देणे परवडणारे नाही. म्हणूनच पूर्ण विचार करून मी मुल होऊ द्यायची नाहीत असा निर्णय घेतल्याचे लतिका विचारेने( नाव बदलले आहे) सांगितले.

- आमचं दोन वर्षांपूर्वी कोरोनाच्या आधी लग्न झालं. आमचे काही मित्र-मैत्रीणी अपत्याविनाही चांगलं जगताना आम्ही पाहतोय. तर काही मित्र-मैत्रीणींची तर मुलांसह करिअऱ, घर सांभाळताना प्रचंड कसरत होतेय. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे जगण्याचा भरवसा राहिलेला नाही, अशा परिस्थितीत मुलं जन्माला घालून त्यांच्या जगण्याचं टेन्शन घेणं परवडणारं नाही, हे आमच्या या काळात लक्षात आलं. म्हणून आम्ही चाईल्डफ्री राहण्याचा निर्णय घेतल्याचं योगिता सुतार (नाव बदलेलं आहे) ने सांगितलं

- मी ३५ वर्षांची आहे. करिअऱ मस्त चालू आहे. अजून माझं लग्न झालेलं नाही. पण चांगला जोडीदार मिळाला तर लग्न मात्र नक्कीच करेनं. पण आता मुलाला जन्माला घालण्याचं वयही उलटून गेलंय शिवाय त्याची जबाबदारी नीट घेऊ शकेन का याविषयी शंका वाटते, म्हणून भविष्यात मी मुलं होऊ देणार नाही. तशाच विचारांचा पार्टनर मिळाला तर बरं होईल, असं अश्लेषा काटदरे(नाव बदलले आहे) ने सांगितलं.

Childfree Womens
पालकांनो, मुलांना झोपेची शिस्त लावा! वाचा अभ्यास काय सांगतो

तज्ज्ञ काय म्हणतात?

लग्न होऊनही चाईल्डफ्री राहण्याचा निर्णय घेतलेल्या आणि याविषयी विविध सेमिनार्स घेऊन मार्गदर्शन करणारी नियती बापट महिला हा निर्णय का घेत आहेत ते विस्ताराने सांगते. ती म्हणते मुलं हवय तर का हवंय, नको तर का नकोय हे ठरविण्याचा अधिकार महिलांना आहे. त्यामुळे त्यांनी ठरवावं याविषयी. महिलांकडून अशी अपेक्षा असते कि विशिष्ट वय झाल्यावर मुलींचे लग्न झाले पाहिजे, त्यानंतर त्यांना मुलं झाली पाहिजेत. ही अपेक्षा संपूर्ण समाजाकडून असते. स्त्रियांकडून ही अपेक्षा जास्त असते. वर्षानुवर्षाच्या अनुभवामुळे समाजाच्या अपेक्षा अशा तयार झालेल्या आहेत. या स्टिरिओटाईप अपेक्षांमुळे महिलांना अनेक निर्णय घ्यावे लागले. पण या अपेक्षांतून अनेक महिलांना बाहेर पडायचे आहे, किंबहुना तेच महिलादिनाचे एक उद्दीष्ट असावे. सिंगल राहणं, मुलं नको असणं ही नॉर्मल गोष्ट आहे, हे आता आपल्या समाजाने स्विकारण्याची गरज आहे. तुम्ही या सगळ्या अपेक्षा पूर्ण करू शकत नसाल तर हा मुल होऊ न देणे हा तुमचा चॉईस आहे. समाजामध्ये शिक्षणाची पातळी, समृद्धी वाढते तशी मुलींमध्ये अधिकाराची जाणीव होते. त्यातूनच मुल नकोय हा पर्याय ती घेऊ शकते.

Childfree Womens
शारीरिक जवळीक साधण्यासाठी ५४ टक्के महिलांचा स्वत:हून पुढाकार - रिपोर्ट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()