निसर्गाने पुरुषांना महिलांच्या तुलनेत शारीरिकदृष्ट्या अधिक मजबूत बनवलं आहे. पुरुषांची साधारण उंची महिलांहून Women अधिक असते. त्यांचे स्नायू Muscles महिलांच्या तुलनेत अधिक बळकट असतात. महिल्यांच्या तुलनेत ते अधिक वजन उचलण्यास सक्षम असतात. त्यामुळेच अनेक मैदानी खेळांमध्येही पुरुषांना फारसे कष्ट घ्यावे लागत नाही. Why Women live longer than male Reserch of Horward Medical
असं असलं तरी मेडिकल टर्ममध्ये म्हणजेच जेव्हा आरोग्याचा Health प्रश्न येतो. तेव्हा मात्र पुरुष कुमकुवत ठरतात. महिलांच्या Women तुलनेत पुरुषांना Male विविध आजार होण्याची शक्यता जास्त असते तसचं महिलांच्या तुलनेत ते कमी जगतात म्हणजेच त्यांच आयुष्य कमी असतं. यामुळेच पुरुषांना वीकर जेंडर मानलं जातं.
गेल्या शंभर वर्षात विज्ञानाने मोठी प्रगती केली आहे. अनेक आजारांवर उपचार आणि औषध तयार करण्यात आली आहेत. अनेक प्रतिबंधक लसी आल्या आहेत. यामुळे सरासरी वयात लक्षणीय वाढ झाली आहे. मात्र असं असलं तरी आजही स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त निरोगी आहेत आणि त्या जास्त काळही जगतात. यामागचं नेमकं कारण काय हे शोधण्याचा प्रयत्न हाॅवर्ड मेडिकलने केला आहे.
या संशोधना दरम्यान या मागे विज्ञान आणि निसर्गाची देण या दोन्ही गोष्टी महत्वाच्या असल्याचं समोर आलं आहे. महिला जन्म घेताच म्हणजेच एका मुलीचा जन्म झाल्यानंतर लगेचच ती एका मुलाच्या तुलनेत आरोग्याच्या दृष्टीने अधिक बलवान होते. यामागचं शंभर टक्के योग्य उत्तर सापडणं शक्य नसलं तरी हार्वडच्या संशोधनातील विश्लेषणात काही घटक नमूद करण्यात आले आहेत. ज्यात महिला पुरुषांपेक्षा अधिक निरोगी राहण्यामागचं कारण स्पष्ट करण्यात आलंय.
जीन- हावर्ड मेडिकलच्या वेबसाइटनुसार गर्भाच्या विकासाआधीच महिला आणि पुरुष लिंगाची वाढ वेगवेगळी होते. दोघांमध्ये २३ क्रोमोजोमच्या जोड्या असतात. २२ जोड्या सारख्याच असतात मात्र २३ वी जोडी वेगवेगळी होते. पुरुष गर्भ असल्यास २३व्या जोडीत एक एक्स X आणि एक वाई Y क्रोमोजोम असतात.
हे देखिल वाचा-
तर स्त्री भ्रूणात दोन्ही एक्स असतात. Y गुणसूत्र हे X पेक्षा एक तृतीयांश लहान असते शिवाय त्यात जीन्सही कमी असतात. महत्वाची बाब म्हणजे पुरुषांमधील काही आजारांचा थेट त्यांच्या या Y क्रोमोजमशी संबध असतो. त्यामुळे पुरुषांमध्ये महिलांच्या तुलनेत काही आजारांची जोखीम जास्त असते.
हार्मोन- तर पुरुषांमधील टेस्टोस्टेरॉन हे त्यांच्यासाठी घातक ठरू शकतं. कारण हेच टेस्टोस्टेरॉन वेळेपूर्वी हृदयांच्या स्नायूंना कुमकुवत बनवण्यास सुरूवात करतं. यामुळेच हृदयाशी संबंधीत अनेक आजारांचा धोका वाढतो. तर दुसरीकडे स्त्रीयांमध्ये असलेले महत्वाचे असे एस्ट्रोजन हार्मोन हृदयाचं रक्षण करण्यासाठी महत्वपूर्ण कामगिरी बजावतात. यामुळेच महिलांना हृदविकारांचा धोका कमी असतो.
प्रजनन अंग- पुरुषांमधील प्रजननासाठी महत्वाचे असलेलं प्रोस्टेट ग्लँडमुळे देखील अनेक आरोग्य विषयक समस्या निर्माण होतात. खरं तर महिलांना देखील ब्रेस्ट कॅन्सर, गर्भाशयाचा कॅन्सर तसचं युट्रसच्या समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे महिलांना याबबाती अधिक त्रास आहे असा समज असला. तरी पुरुषांना इतर कॅन्सर होण्याचं प्रमाण जास्त आहे.
मेटाबोलिजम- आश्चर्याची बाब म्हणजे हृदयाला सुरक्षित ठेवणाऱ्या गुड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण महिलांमध्ये जास्त असतं. महिलांमध्ये गुड कोलेस्ट्रॉव ६०.३ मिलीग्रॅम प्रिती डेसीलिटर असतं तर पुरुषांमध्ये हे प्रमाण ४८.५ इतकं असतं. यामुळेच पुरुषांमध्ये हृदयासंबंधीत आजारांचा धोका वाढतो. तर महिलांमध्ये तो कमी असतो. त्यामुलेच लठ्ठपणा आणि इतर आजारांची जोखीम कमी असते आणि मेटाबोलिज्म सक्रिय राहतं.
सामाजिक-व्यावहारिक फॅक्टर- याशिवाय इतर काही सामाजिक आणि व्यावहारिक घटकांचा देखील पुरुषांच्या आरोग्यावर आणि एकूणच जीवनमानावर परिणाम होत असतो. महिलांवर पुरुषांच्या तुलनेत कामाचा ताण कमी असतो. त्या जास्त सोशल नेटवर्गिंक म्हणजेच कुटुंबात किंवा मैत्रिणींमध्ये रमतात त्यांच्यात हिंसा आणि आक्रमकता कमी असते. महिला पुरुषांच्या तुलनेत कमी प्रमाणात सिगारेट, तंबाकू आणि दारूचं सेवन करतात. पुरुषांच्या तुलनेत बऱ्याचदा त्यांचा आहार पोषक असतो. घरातील कामांमुळे त्या सक्रिय राहतात. त्यामुळेच त्या पुरुषांच्या तुलनेत जास्त निरोगी राहतात.
हार्वड मेडिकलच्या संशोधनानुसार या काही घटकांमुळे महिला पुरुषांपेक्षा आरोग्यदायी जीवनशैली जगतात आणि निरोगी राहतात. तसचं त्यांना दिर्घायुष्य लाभतं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.