चालताना टाचेत वेदना होतात का? जाणून घ्या काय आहेत कारणे?

चालताना टाचेतून अचानक तीव्र कळ येणे किंवा सातत्याने टाच दुखत राहणे अशी अनेकांची समस्या असते.
pain in heel
pain in heel
Updated on

टाच दुखणे ही अनेकांची समस्या आहे. चालताना टाचेतून अचानक तीव्र कळ येणे किंवा सातत्याने टाच दुखत राहणे अशी अनेकांची समस्या असते. टाचांचे दुखणे हळूहळू वाढते आणि कालांतराने ते अधिक जाणवू लागते. चालताना टाचांवर भार टाकला तर ती कळ वाढते. याची नेमकी कारणे कोणती आहेत हे जाणून घेतल्यास तुम्ही या समस्येपासून वेळेत पिच्छा सोडवू शकता.

अनेकांना दोन्ही टाचांमध्ये वेदना होत असतात. तुम्ही बराच वेळ एकाच जागी बसल्यानंतर ही वदेना येते. याशिवाय बराच वेळा चालल्यानंतरही टाच दुखायला लागते. त्यामुळे बरेच लोक टाचांवर भार देण्याचे टाळतात. कॅल्शियम कमी असणे, अंगात लठ्ठपणा असणे किंवा अधिक व्यायाम करणे ही टाचदुखीची काही मुख्य कारणे असू शकतात. या

pain in heel
Chanakya Niti: आर्थिक प्रश्नांची उत्तरे हवी असतील तर चाणक्य यांनी सांगितलेल्या 'या' चार लक्षात ठेवा

टाचेला वेदना होणे ही समस्या अनेकांना सतावत असते. न्यूयॉर्कमधील एका संशोधनानुसार, प्लांटार फॅसिआ हा टिश्यूचा एक पट्टा आहे जो तुमच्या पायाच्या खाली असतो. जो पट्टा पायांची बोटे टाचांना जोडतो. यामुळे पायाचे काही झटके शोषूण घेण्यास मदत करत असतो. परंतु चालताना किंवा धावताना वारंवार दबाव आल्याने टाचांना सूज येते. एखाज्या वेळेस पटकन उठताना, बसताना किंवा उभे राहिल्यानंतर या वेदना जाणवतात.

तुमच्या शरीराचा सर्वात मोठा भाग, अकिलीस टेंडन तुमच्या टाचांच्या हाडांशी जोडलेला असतो. चालणे आणि धावणे यांसारख्या क्रियामुळे हा बदल होत असतो. टाचांचे घट्ट स्नायूही हा तणाव वाढवू शकतात. त्यामुळे तुम्हाला तीव्र वेदना होत असतील तर तुम्ही डॉक्टरांना भेट देऊ शकता.

pain in heel
coconut oil : त्वचेवर खोबरेल तेल लावण्याचे फायदे, काही वेळातच मिळेल आराम; वाचा सविस्तर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.