कोणत्याही नात्यात प्रेम, जिव्हाळा, विश्वास आणि आदर असेल तर ते नातं शेवटपर्यंत टिकून राहतं असं म्हटलं जातं. परंतु, सध्याच्या काळात नात्यातील हा विश्वास, आदर आणि जिव्हाळा कुठेतरी लुप्त होताना दिसत आहे. त्यामुळेच आज अनेक जोडप्यांमध्ये वाद होत असून घटस्फोटाचं प्रमाणही वाढलं आहे. मात्र, हे वाद नेमके का होतात याचं मूळ शोधायचा कोणी प्रयत्न केला आहे का?आता प्रत्येकाच्या वादाची कारणं जरी वेगवेगळी असली तरीदेखील त्याचं मूळ एकच आहे. ते म्हणजे परस्परांविषयी न वाटणारा आदर. जर नात्यात आदर नसेल तर ते नातं फार काळ टिकत नाही. म्हणूनच, जर तुमचेही जोडीदारासोबत सतत वाद होत असतील. किंवा, जोडीदार तुमचा आदर करत नाही, असं वाटत असेल तर त्यामागचं नेमकं कारण शोधून काढलं पाहिजे. थोडक्यात, काय तर पार्टनर तुमचा अनादर का करते त्याची कारण काय ते या लेखातून पाहुयात. (why-your-wife-doesnt-respect-you-know-the-reason)
१. असुरक्षिततेची भावना -
आपल्या पार्टनरचं आपल्यावर प्रेम आहे ही एक सुरक्षिततेची भावना असते. मात्र, ज्यावेळी पार्टनरचं आपल्याकडे दुर्लक्ष होतंय किंवा त्याचं आपल्यावरचं प्रेम कमी झालंय असं पत्नीला वाटू लागतं. त्यावेळी तिच्या मनात असुरक्षितता निर्माण होते. त्यामुळे करिअरमध्ये तुम्ही किती यशस्वी असाल पण जर भावनिकरित्या पत्नीसोबत जोडलेला नसाल तर तुमच्यात वाद होऊ शकतात. नवऱ्याचं आपल्याकडे लक्षच नाही. त्याला आपली किंमत नाही अशी भावना स्त्रियांच्या मनात निर्माण होते. परिणामी त्या चिडचिड करतात. यातूनच मग पुढे वाद निर्माण होऊ शकतात. त्यामुळे पत्नीला असुरक्षित वाटणार नाही किंवा तिच्यावर तुमचं असलेलं प्रेम लहानसहान गोष्टींमधून व्यक्त करत जा.
२. नकारात्मक विचार -
अनेक पुरुषांना सतत नकारात्मक बोलण्याची सवय असते. किंवा इतरांसोबत तुलना करायची सवय असते. तुमच्या या स्वभावाचाही पत्नीला राग येऊ शकतो. सतत असं नकारात्मक बोलल्यामुळे घरातील वातावरणही नकारात्मक होऊ लागतं. घरातील सकारात्मक ऊर्जा कमी होऊ लागते. त्यामुळे सहाजिकच पत्नी तुमच्यावर चिडू शकते.
३. ध्येयापासून दूर जाणे -
लव्ह मॅरेज केल्यानंतरही जोडप्यांमध्ये वाद होत असतील तर लोक सहाजिकच भुवया उंचावतात. परंतु, हे वाद का होतात या मागील कारणं फार कमी जणांना माहित असतील. लग्नापूर्वी मुलं अनेकदा मुलींना लग्नानंतरचे प्लॅन सांगत असतात. लग्नानंतर कोणते ध्येय पूर्ण करायची आहे. सक्सेस कसं गाठायचं आहे याचा प्लॅन आखात असतात. मात्र, लग्नानंतर मुलांना या सगळ्याचा विसर पडतो. ते त्यांच्या डेली रुटीनमध्ये गुंतून जातात. परिणामी, ध्येयापासून आपोआप दूर होतात. या गोष्टींचा पत्नीला लग्नानंतर नक्कीच राग येऊ शकतो. लग्नापूर्वी रंगवलेली स्वप्न प्रत्यक्षात उतरत नसतील तर त्यांचा संताप होणं सहाजिक आहे. त्यामुळे ध्येयापासून दूर जाऊ नका. ध्येय गाठण्यासाठी पत्नीची मदत घ्या आणि ते पूर्ण करा.
४. कामात मदत न करणे -
आज पुरुषांच्या बरोबरीने स्त्री घराबाहेर पडून काम करत आहे. मात्र, घराबाहेर पडत असताना सुद्धा तिचं अर्ध लक्ष घरात असतं. त्यामुळे जरी आज ती वर्किंग वुमन म्हणून ओळखली जात असली तरीदेखील तिच्या मागचं घराचं चक्र काही थांबलेलं नसतं. दररोज ती घर आणि ऑफिस या रहाटगाड्यात अडकून गेली असते. यात अनेकदा तिला स्वत:ला देखील वेळ देता येत नाही. काही दुखत, खुपत असेल तरीदेखील तिला या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. विशेष म्हणजे कितीही त्रास झाला तरीदेखील ती जबाबदारीपासून पळ काढत नाही. मात्र, या प्रवासात तिला जोडीदाराकडून मदतीची अपेक्षा असते. निदान जोडीदाराने घरातील लहानसहान कामांमध्ये तरी मदत करावी, वस्तू जागच्या जागी ठेवाव्यात अशा किमान अपेक्षा असतात. मात्र, जोडीदार याकडे दुर्लक्ष करत असेल किंवा तिचा त्रास तुम्हाला दिसत नसेल तर तिची चिडचिड होणं सहाजिकच आहे. त्यामुळे जर तुम्ही तिच्यावर मनापासून प्रेम करत असाल तर तिची लहान लहान कामात मदत करा. जर घरातील कामे लवकर पूर्ण झाली तर तुम्हाला देखील एकमेकांना वेळ देता येऊ शकतो. ज्यामुळे पुढे होणारे वाद टळू शकतात.
५ . वैचारिक मतभेद-
सध्याच्या काळात अनेक जोडप्यांमध्ये निर्माण होणारी समस्या म्हणजे वैचारिक मतभेद. अनेक जोडप्यांचे विचार, आवडीनिवडी जुळत नसतील तर वाद होऊ शकतात. त्यामुळे तुमचा एखादा विचार पत्नीला पटत नसेल. तर तो तिला नीट समजवायचा प्रयत्न करा. त्यामुळे होणारे वाद टळू शकतात.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.