Winter Beauty Tips : Vaseline फक्त स्कीनसाठीच नाही तर केसांसाठीही उपयुक्त
Vaseline Good for Skin as well for Hair Moisturising : Vaseline ला पेट्रोलियम जेली म्हणून पण ओळखलं जातं. व्हॅसलीनची डबी आपल्याला घरात सहज मिळते. साधारणतः हिवाळ्यात ओठ फाटल्यावर किंवा त्वचा कोरडी पडल्यावर याचा वापर होतो. पण तुम्हाला माहिती आहे का, याचा उपयोग केसांना मॉईश्चराइज करण्यासाठीही केला जातो? जाणून घ्या फायदे.
Vaseline केसांसाठी खरच चांगलं आहे का?
मॉईश्चरायझिंगसाठी पेट्रोलियम जेलीला उत्तम पर्याय मानला जातो. याची मॉईश्चरायझिंग क्षमता ऑलिव्ह ऑईलपेक्षा चांगली मानली जाते. म्हणूनच ड्राय केसांना मॉईश्चरायझिंग करण्यासाठी याचा वापर करता येऊ शकतो.
जाणून घ्या फायदे
स्काल्प हेल्थ सुधारते
व्हॅसलिनचा मॉईश्चरायझिंग आणि अँटीमायक्रोबियल घटक स्काल्पला सुदृढ होण्यासाठी मदत करतात. ड्राय स्कल्पची समस्या सुटते. व्हॅसलिनमधल्या नैसर्गिक कच्च्या तेलांमुळे केसांबरोबर स्काल्पचीपण निगा राखली जाते.
कोंडा जातो
स्काल्पशी निगडीत समस्यांमध्ये सर्वात पहिले आठवतं ती कोंड्याची समस्या. ही समस्या कोणत्याही वयोगटात असू शकते. अँटीमायक्रोबियल यासाठी प्रभावी ठरू शकतो.
असा बनवा हेअर पॅक
एक चमचा व्हॅसलिन, अर्धा चमचा खोबऱ्याचं तेल. पहिले खोबऱ्याचं तेल गरम करावं. त्यात व्हॅसलिन मिक्स करा. मग मुळापासून केसांच्या टोकापर्यंत लावा. रात्रभर राहू द्या आणि सकाळी शॅम्पू करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.