Winter Sweater Care Tips: हिवाळ्याची अंग थरारून टाकणारी थंडी जाणवण्यास सुरवात झाली की आठवते ते कपाटात, पेटीत कुठेतरी अडगळीत ठेवलेले स्वेटर, जॅकेट. नाहीतर दुकानात जाऊन नवेकोरे उबदार कपडे घेण्याची संधीही उपलब्ध होते. मात्र, हंगामापुरता वापर असलेल्या या स्वेटर, जॅकेटची अनेक जण काळजी घेत नाहीत. परिणामी वापरानंतर काही दिवसांतच नवेकोरे स्वेटर, जॅकेट जुने दिसू लागते. त्यामुळे स्वेटरचे नवेपण टिकवण्यासाठी त्याची काळजीही घेता येईल.