Natural Skin Care: हिवाळ्यात त्वचेची चमक कमी होणे, कोरडी पडणे एक सामान्य समस्या आहे, कारण थंडीच्या दिवसांत हवेत आर्द्रतेची कमतरता असते, त्यामुळे त्वचा कोरडी आणि निर्जीव बनते.
त्वचा ताणलेली वाटते आणि नैसर्गिक चमक कमी होते. त्यामुळे आपलाच चेहरा आपल्याला आवडत नाही. ही नैसर्गिक चमक परत आणण्यासाठी आपण अनेक प्रकारची क्रीम्स लावतो ज्यात केमिकल्स असतात. असे यामुळे चेहऱ्याला फायदा होण्याऐवजी हानी पोहोचवू शकतात.
त्यामुळे तुम्ही पुढील काही घरगुती उपाय करू शकता. जर तुमच्या चेहऱ्याची नैसर्गिक चमक कमी झाली असेल आणि तुम्हाला ती परत मिळवायची असेल तर तुम्ही आंघोळीनंतर पुढील गोष्टींचा वापर करावा.