हिवाळ्यात त्वचा कोरडी का पडते? जाणून घ्या कारण आणि उपाय

हिवाळ्यात बहुतेक लोक पाणी कमी पितात. थंड हवा त्वचेतील आर्द्रताही शोषून घेते
Dry skin
Dry skinDry skin
Updated on

केवळ हवामानामुळे (Winter) त्वचेचा कोरडेपणा वाढत (Dry skin) नाही. त्वचा चमकदार, कोरडी आणि निर्जीव दिसण्यामागे खाण्याच्या सवयी (Eating habits) देखील कारणीभूत आहेत. जेव्हा त्वचेत कोरडेपणाची समस्या उद्भवते तेव्हा बदलत्या हवामानाला, साबणाला किंवा हँडवॉशला पूर्ण कारणीभूत ठरवतो. कारण, बहुतेकांना हे माहीत नाही की चुकीच्या अन्न खाल्ल्यानेही त्वचेत कोरडेपणा वाढतो. विरुद्ध प्रकृतीच्या दोन गोष्टी एकत्र खाण्याचा क्रम असाच सुरू ठेवला तर त्वचेला कितीही मॉइश्चरायझर (Moisturizer) लावले तरी काही वेळातच त्वचा पुन्हा कोरडी झालेली जाणवेल. (Take care of your skin in winter)

शरीरात होणाऱ्या रासायनिक अभिक्रियांमुळे काही खाद्यपदार्थ ज्यांचे गुणधर्म एकमेकांच्या विरुद्ध असतात ते एकत्र खाल्ल्यास (Eating habits) बाष्पीभवन वाढते. त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता होऊ लागते. याचा पहिला परिणाम त्वचेवर दिसून येतो. हिवाळ्यात बहुतेक लोक पाणी कमी पितात. थंड हवा त्वचेतील आर्द्रताही शोषून घेते. अशा परिस्थितीत शरीर आतून निर्जलीकरण होऊ लागले तर त्वचेत चमक कशी राहील. त्वचेला मॉइश्चरायझर लावण्यासोबतच ते आतून हायड्रेट ठेवण्यासाठी या गोष्टींचे योग्य सेवन करणे महत्त्वाचे आहे.

Dry skin
तुकाराम मुंढे येणार अडचणीत; महापालिकेवर बरखास्तीची तलवार

थंड, उष्ण पदार्थांचे एकत्र सेवन करू नका

थंड (Winter) आणि उष्ण पदार्थांचे एकत्र सेवन करू नका. गरम सँडविच किंवा रोलसह थंड पेय घेणे. त्यामुळे त्वचेवर कोरडेपणा वाढतो (Dry skin) आणि वयाचा प्रभाव लवकर पडतो. तुमचे पचन मंद असेल तर मध जास्त प्रमाणात खाऊ नका. मुळा, मासे किंवा चिकन खाणे टाळा. पचन मंद असताना या गोष्टी खाल्ल्याने चयापचयावर अतिरिक्त ताण पडतो.

विरोधी गुणधर्म असलेले अन्न

दोन विरोधी गुणधर्म असलेले अन्न एकत्र खाल्ल्याने त्वचेतील कोरडेपणा (Dry skin) वाढतो. एकाच वेळी मासे आणि दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करणे टाळा. मुळा पराठ्यासोबत दूध किंवा चहाचे सेवन करणे. मिठापासून बनवलेल्या वस्तूंनी दूध पिणे. या सर्व गोष्टी आहारविरोधी आहेत. एकाच वेळी एकत्र खाणे टाळा.

सूर्य किंवा उष्णतेचा दीर्घकाळ संपर्क

जास्त वेळ उन्हात राहिल्यास किंवा गरम ठिकाणी जास्त वेळ घालवला तरी तुमच्या त्वचेचा कोरडेपणा झपाट्याने वाढतो. अशा परिस्थितीत आहार योग्य ठेवणे आणि त्वचेची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.

Dry skin
‘बसपन का प्यार’ फेम सहदेव अपघातात जखमी; डोक्याला पडले चार टाके

शारीरिक क्षमतेपेक्षा जास्त व्यायाम

शारीरिक क्षमतेपेक्षा जास्त व्यायाम केला तरीही त्वचा कोरडी (Dry skin) होते. खूप मेहनत केल्यानंतर आणि खूप घाम गाळल्यानंतर गरम पाण्याने अंघोळ करता तेव्हा त्वचेत जास्त कोरडेपणा येतो. तेव्हा शारीरिक क्षमतेपेक्षा जास्त व्यायाम करू नका. काही मेहनत केल्यानंतर आंघोळ करावी लागते तेव्हा आंघोळीनंतर लगेच मॉइश्चरायझर (Moisturizer) लावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.