Vegetable For Constipation: जर तुम्हाला बद्धकोष्ठतेमुळे तासांतास टॉयलेटमध्ये बसूण राहावे लागत असेल तर हिवाळ्यात या समस्येपासून आराम मिळवू शकता. हिवाळ्यात अनेक भाज्या मिळतात, ज्या खाल्ल्याने बद्धकोष्ठतेपासून सुटका मिळते. या भाज्या पोट साफ करण्यास मदत करतात, पचनक्रिया सुधारतात आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर करतात.
कच्च्या भाज्या खाल्ल्याने अनेक फायदे मिळतात. जेव्हा तुम्ही भाज्या कच्च्या खातात तेव्हा त्यातील अधिक पोषक घटक जसे की जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स जतन केले जातात.
स्वयंपाक केल्याने पाण्यात विरघळणारे जीवनसत्त्वे आणि काही अँटिऑक्सिडंट्स यांसारख्या काही पोषक घटकांची हानी होऊ शकते. त्यामुळे आपल्या आहारात कच्च्या भाज्यांचा समावेश करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. तुम्ही हिवाळ्यात पुढील पाच भाज्या कच्च्या देखील खाऊ शकता.