Wired Tradition : बायकोला मारणारे खूप आहेत, पण बायकोसाठी मार खाणारे फक्त हेच, वाचा जगावेगळ्या परंपरेची कथा

लग्नासाठी खावा लागतो भरचौकात मार, आफ्रिकेतील या प्रथेच कौतुकच होतं
Wired Tradition
Wired Tradition esakal
Updated on

Wired Tradition :

जगात असे अनेक देश आहेत जिथे आजही आदिवासी राहतात जे त्यांच्या विचित्र परंपरांमुळे चर्चेत राहतात. या परंपरा जगाला विचित्र वाटल्या तरी त्या जमातीचे लोक आजपर्यंत त्यांचे पालन करत आहेत. केवळ पालनच नाहीतर ते लोक त्या परंपरा जगतात. मोबाईल इंटरनेटच्या जमान्यात हे लोक मागासलेले आहेत.

अशा अनेक जमाती अजूनही आफ्रिकेत राहतात ज्यांच्या श्रद्धा आश्चर्यकारक आहेत. अशीच एक जमात म्हणजे फुलानी ज्यात पुरुषांना पत्नी मिळवण्यासाठी वेदना सहन कराव्या लागतात. होय, आपल्या जमान्यात अनेकदा पत्नीला मारहाण केली जाते. याच्या अनेक केसेसही रोज पेपरात येतात. पण अशात इथले पुरूष पत्नीला मिळवण्यासाठी मार खातात.

Wired Tradition
South Africa : भारतीय वंशाच्या क्रिकेटपटूचं दक्षिण आफ्रिकेत निधन

नायजेरिया देशात फुलानी नावाची एक जमात आहे जी पश्चिम आफ्रिकेतील अनेक देशांमध्ये आढळते. या जमातीत शारो फेस्टिव्हल नावाचा उत्सव असतो ज्यात पुरुषांना मारहाण केली जाते. तेही तिथल्या समाजातील सर्व लोकांसमोर. या सणात कोणत्या पुरुषाला त्याच्या आवडीची बायको मिळणार हे ठरवले जाईल. येथे पुरुषांकडून मारहाण होणे ही त्यांच्यासाठी अभिमानाची आणि सन्मानाची बाब मानली जाते.

Wired Tradition
World Cup 2023: 1999 च्या सेमीफायनलची पुनरावृत्ती होणार? | South Africa vs Australia

या उत्सवात अविवाहित पुरुष जमतात आणि मग समाजातील मोठे लोक त्यांना लाकडी दांडक्याने मारहाण करतात. इतर लोक आणि मुलांचे कुटुंब त्यांना प्रेक्षकांप्रमाणे पाहतात. मुलाने मारहाण सहन करावी, तो लवकर थकू नये, यासाठी ते प्रार्थना करतात.

जर मुलगा दुखण्यामुळे मार सहन करू शकत नसेल तर तो अशक्त समजला जातो आणि मग मुलगी तसेच तिचे कुटुंबीय त्याला नकार देतात. तो लग्न करण्या लायक नाही, असे मानतात.

Wired Tradition
Nashik Wedding Tradition : गाव करील ते राव काय करील! येथे आहे लग्नसोहळ्याची अनोखी पद्धत...

मारहाण करण्यामागील कारण म्हणजे तो जितका वेदना सहन करेल तितके त्याचे भावी पत्नीवरचे प्रेम वाढत जाईल. असे मानले जाते की वेदना सहन करून पुरुष दाखवतात की ते मुलीवर खूप प्रेम करतात आणि तिच्यासाठी कितीही वेदना सहन करू शकतात. हे फक्त एका मुलासोबत नाही तर एकाच वेळी अनेक मुलांसोबत घडते.

अनेक वेळा ही स्पर्धा फक्त एका मुलीसाठी असते. अनेक स्पर्धक मुलगी मिळवण्यासाठी जमतात आणि जो जिंकतो तो मुलीचा वर बनतो. किंवा विजेता मुलगा त्याच्या आवडीची मुलगी निवडू शकतो. त्यांच्या शरीरावर असलेली जखम त्यांच्या शौर्याचे प्रतीक मानली जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.