ATM मधून नाही आता या पद्धतीने काढू शकाल 'मोफत' पैसे!

Free Cash Withdrawal: मायक्रो एटीएम (Micro ATM) आणि आधार इनेबल्ड पेमेंट सिस्टमच्या (Aadhaar Enabled Payment System) माध्यमातून आपण विनाशुल्क पैसे काढू शकतो.
Free Cash Withdrawal for free
Free Cash Withdrawal for freeEsaka
Updated on

मोफत पैसे कसे काढायचे? (Free Cash Withdrawal):

नवीन वर्षात एटीएमशी संबंधित नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India) सर्व एटीएममधून (ATM) मोफत व्यवहारांची मर्यादा संपल्यानंतर आकारण्यात येणाऱ्या व्यवहार शुल्कात (ATM Transaction Charge) वाढ केली आहे. ही वाढ जरी माफक असली तरीही तुम्हाला हवं असल्यास तुमच्याकडे अजूनही काही पर्याय आहेत जिथे पैसे काढण्यासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. हे मार्ग म्हणजे मायक्रो एटीएम (Micro ATM) आणि आधार इनेबल्ड पेमेंट सिस्टम (Aadhaar Enabled Payment System) आहेत. मायक्रो एटीएम आणि आधार सक्षम पेमेंट सिस्टम म्हणजे काय ते जाणून घेऊया.

एटीएममधून पैसे काढणे (Cash ATM Transaction) नवीन वर्षापासून म्हणजेच १ जानेवारीपासून महाग झाले आहे. 1 जानेवारीपासून ग्राहकांना नॉन-कॅश एटीएम व्यवहाराची मर्यादा ओलांडल्यानंतर (Non-Cash ATM Transaction) आतापेक्षा जास्त पैसे द्यावे लागतील. गेल्या वर्षीपर्यंत, बँकेच्या एटीएम किंवा कॅश रिसायकल मशीनमधून कॅश आणि नॉन-कॅश व्यवहारांसाठी महिन्यातील पहिले 5 आर्थिक व्यवहार विनामूल्य होते. यानंतर प्रति आर्थिक व्यवहारासाठी 20 रुपये शुल्क आकारले जात होते, मात्र आता 1 जानेवारी 2022 पासून हे शुल्क प्रति आर्थिक व्यवहारासाठी 21 रुपये झाले आहे.

Free Cash Withdrawal for free
ATM मधून पैसे काढताय? जास्त व्यवहारांसाठी द्यावं लागणार इतके शुल्क

1. माइक्रो-एटीएम मधून काढा मोफत पैसे (Withdraw free money from micro-ATM)-

भारतीय रिझर्व्ह बँकेने एटीएममधून पैसे काढण्याचे शुल्क वाढवले ​​असले तरी या निर्णयाचा मायक्रो एटीएमवर परिणाम होणार नाही. म्हणजेच तिथून पूर्वीप्रमाणेच फुकटात पैसे येतील. मायक्रोएटीएम हे प्रत्यक्षात एक पीओएस (POS Machine) मशीन आहे, म्हणजे स्वाइप मशीन, जी डेबिट आणि क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी दुकानांमध्ये स्थापित केली जाते. यासाठी तुम्हाला तुमचे डेबिट कार्ड स्वाईप करावं लागेल. त्यानंतर रक्कम टाकावी लागेल आणि नंतर पिन टाकावा लागेल. तुम्हाला आवश्यक तेवढी रक्कम तुमच्या खात्यातून कापली जाते. जेवढी रक्कम कापली गेली आहे तेवढी रक्कम दुकानदार तुम्हाला देऊ करेल. अशाप्रकारे, तुम्हाला ना बँकेत जावे लागेल ना एटीएमच्या लाईनमध्ये उभे राहण्याची चिंता करावी लागेल.

ही सुविधा सर्वत्र उपलब्ध नाही, परंतु केवळ निवडक स्टोअरमध्ये उपलब्ध आहे. गेल्या काही वर्षांत मायक्रोएटीएमचा ट्रेंड खूप वाढला आहे, कारण एटीएम बसवण्याइतका खर्च येत नाही, परंतु काम मात्र एटीएमसारखे केले जाते. या मशिनमधून पैसे काढण्याबरोबरच पैसे जमा करणे, ट्रान्सफर करणे, तिकीट बुकिंग आणि सर्व प्रकारची ऑनलाइन पेमेंट करता येतात.

Free Cash Withdrawal for free
ATM कार्ड हरवलंय? मग असं करा ब्लॉक

2. आधार सक्षम पेमेंट प्रणाली (Aadhaar enabled payment system)-

तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही आधार सक्षम पेमेंट सिस्टम वापरून मोफत पैसे देखील काढू शकता, कारण नवीन RBI नियम यावर देखील लागू होत नाही. या सुविधेअंतर्गत, वित्तीय संस्था तुम्हाला तुमच्या फिंगरप्रिंट आणि मोबाईल नंबरच्या मदतीने पैसे काढण्यास मदत करतात. NPCI ने तयार केलेल्या या प्रणालीमध्ये UIDAI मार्फत प्रमाणीकरण केल्यानंतरच व्यक्तीच्या खात्यातून पैसे काढले जातात. यामध्ये तुम्हाला ना डेबिट कार्डची गरज आहे आणि ना पिन टाकण्याची गरज आहे. याचे मशीन देखील स्वाइप मशीनसारखे असते. परंतु त्यात फिंगरप्रिंट स्कॅनर देखील असतो. तथापि, एक गोष्ट लक्षात ठेवा की जर तुमचे आधार तुमच्या बँक खात्याशी लिंक नसेल तर तुम्ही या सुविधेचा लाभ घेऊ शकणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.