कधी-कधी अशा काही घटना कानावर पडतात ज्या ऐकून थक्क व्हायला होतं. केवळ थक्कच नाही तर या घटनांवर विश्वास ठेवणंही कठीण होतं. एखाद्या व्यक्तीमध्ये शारीरिक दोष किंवा अवगुण असणं ही सर्वसामान्य गोष्ट आहे. यात अनेकदा शारीरिक दोषांमध्ये अपंगत्व किंवा एकापेक्षा अधिक अवयव असल्याचं पाहायला मिळतं. मात्र, एखाद्या स्त्रीला दोन Vagina ( योनी) असल्याचं कधी ऐकलं आहे? अर्थात नाही. परंतु, हे प्रत्यक्षात घडलं असून सोशल मीडियावर या महिलेची जोरदार चर्चा सुरु आहे.
सध्या सोशल मीडियावर चर्चेत आलेल्या २५ वर्षीय महिलेने टिकटॉकच्या माध्यमातून तिला दोन Vagina असल्याचं जाहीररित्या सांगितलं आहे. विशेष म्हणजे हे सत्य समोर आल्यानंतर तीदेखील थक्क झाली होती. विदेशात राहणाऱ्या एका महिलेने काही दिवसांपूर्वीच तिच्या बाळाला जन्म दिला. या डिलिव्हरीच्या वेळी तिला एकाऐवजी दोन Vagina असल्याचं समोर आलं.
संबंधित महिलेची डिलिव्हरी होत असताना रुग्णालयातील नर्सने या महिलेला संबंधित घटनेची माहिती दिली. विशेष म्हणजे ही घटना पाहून महिलेसह रुग्णालयातील डॉक्टर, नर्सदेखील अचंबित झाले. मात्र, याच महिलेने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत संबंधित प्रकार नेटकऱ्यांसोबत शेअर केला.
"त्या ठिकाणी एक पडदा असल्याचं मला कायम जाणवत होतं. परंतु, वयानुसार मी मोठी झाल्यावर तो पडदा तुटेल किंवा तो नष्ट होईल असंच मी समजत होते. त्यावेळी मला हेदेखील जाणवत होतं की माझं शरीर इतरांच्या तुलनेत थोडंसं वेगळं आहे. मासिक पाळीच्या काळातही मला प्रचंड वेदना व्हायच्या. त्यामुळे मी अनेक रात्री रडून काढल्यात. परंतु, प्रत्यक्षात सत्य मात्र वेगळंच होतं", असं या महिलेने सांगितलं.
दरम्यान, या महिलेने शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला असून त्याला २.७ मिलिअनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. विशेष म्हणजे हा शारीरिक दोष किंवा व्यंग नसून ती एक समस्या असल्याचं म्हटलं जात आहे. या समस्येला didelphys किंवा double uterus असं म्हटलं जात असून ही अत्यंत दुर्मिळ समस्या आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.