लहुबाई वाघमारे
आपण ज्या समाजात राहत आहोत तिथे कोणत्या न कोणत्या प्रकारे महिलांवर कळत नकळतपणे अन्याय, अत्याचार होत असताना जाणवते. बऱ्याचदा झालेले अन्याय हे बाहेर येत नाहीत. ते नाव, अपमान प्रतिष्ठेच्या नावाखाली तिथल्या तिथेच दाबले जातात. त्यामध्ये कार्यालये, सामाजिक संस्था, सार्वजनिक स्थळे अशा अनेक ठिकाणी महिलांना अशा प्रसंगांना सामोरे जावे लागत आहे. या आणि अशा प्रकारच्या अन्यायाविरुद्ध महिलांचा ‘आवाज’ बनत आहे जनजागृती महिला मंडळ.