पुरूषांच्या 'या' 7 वाईट सवयी महिलांना अजिबात आवडतं नाही

पुरूषांच्या 'या' 7 वाईट सवयी महिलांना अजिबात आवडतं नाही
Updated on
Summary

पुरुषांच्या सर्वात वाईट सवयी

अशा पुरुषांपासून लांब राहतात महिला

खूप काळ टिकत नाही असे नाते

पुरुष असो की महिला, त्यांना एकमेकांच्या काही गोष्टी आवडतात तर काही गोष्टी अजिबात आवडत नाही. महिलांच्याबाबत बोलायचे झाले तर आपला साथीदार म्हणून निवड करताना पुरुषांच्या प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टींवर लक्ष देतात. नुकतेच बॉलीवूड अभिनेत्रीने सुपर मॉडल ऑफ द ईयरच्या सेटवर सांगितले की, मलायका अरोराने सांगितले की, तिला क्लिन शेव आणि गॉसिप करणारे पुरुष आवडतं नाही. महिलांना पुरुषांच्या कोणत्या गोष्टीं आजिबात आवडत नाही हे जाणून घेऊ या.

पुरूषांच्या 'या' 7 वाईट सवयी महिलांना अजिबात आवडतं नाही
घरीच बनवा Green Tea Shampoo; केस होतील घनदाट, सिल्की

नेहमी स्वत:चे कौतूक करणारे पुरुष :

जे पुरुष नेहमी स्वत:चे कौतुक करतात ते महिलांना आजिबात आवडक नाही. असे पुरूष समोरच्याला बोलण्याची संधीही देत नाही. त्यांना नेहमी स्वत: बाबत बोलायचे असते आणि स्वत:बद्दलच ऐकायचे असते. समरोच्या आयुष्यात काय सूरू आहे हे जाणून घेण्यामध्ये अशा पुरूषांना काही रस नसतो. समोरच्या उत्तर न ऐकताचे असे पुरूष सतत बोलत राहतात. महिलांना असे पुरुष मुळीच आवडत नाहीत.

कंट्रोल करणारे पुरुष :

जे पुरुष आपल्या आसपासची प्रत्येक गोष्ट कंट्रोल करु इच्छितात ते महिलांना आवडत नाही. समोरची व्यक्ती जे काही करते, बोलते तसेच जो काही विचार करते तो स्वत:च्या हिशोबाने असावे असेच त्यांना वाटत असते. तुम्ही यांच्या मनाविरुध्द वेगळे काही मत मांडले तर त्यांना पटत नाही आणि ते बरोबर आहात, तुम्ही चूकीचे आहात हे समोरच्याला पटवून देण्याचा प्रयत्न करतात. नात्यामध्ये असे लोक आपल्या पार्टनरला आजिबात स्पेस देत नाही. अशा पुरुषांपासून महिला लांबच राहतात.

पुरूषांच्या 'या' 7 वाईट सवयी महिलांना अजिबात आवडतं नाही
Coconut Benefits : 'नारळ' खरंच आरोग्याचा कल्पवृक्ष आहे?

नेहमी स्वत:चे दुख उगाळत बसणारे पुरुष :

नेहमी स्वत:चे दुख सांगत बसणारे पुरुष ज्यांसोबत असतात त्यांच्या आयुष्यातील आनंद कमी करतात. महिला अशा पुरुषांवर खूप चिडतात. अशा पुरुषांचे नेहमी काही ना काही गोष्टींवर रडगाणे सुरुचं असते. स्वभावाने हे लोक नकारात्मक आणि खूप इमोशनल असतात. असे लोक कोणतीच गोष्ट दुर्लक्षित करू शकत नाही. रिलेशनशीपमध्ये हे लोक नेहमी निगेटीव्ह गोष्टींवर लक्ष देतात आणि पार्टनरला कमी लेखण्याचा प्रयत्न करतात

प्रत्येक गोष्टीसाठी नाटकं करणारे पुरुष :

काही पुरुषांना आपल्या आसपास नेहमी वाद घालण्याची सवय असते. एक समस्या सोडवून झाले की दुसरी समस्या घेऊन येतात. समोरच्या व्यक्तीकडून ते नेहमी सहानुभूती आणि मदत हवी असते, पण त्यांनी दिलेला सल्ला मात्र ऐकत नाही. अशा पुरुषांना गोष्टी ठीक करण्याऐवजी नुसत्या तक्रारी करण्यात समाधान मिळते. रिलेशनशीपमध्ये हे पुरुष आपल्या वागण्यातून स्वत: कसे खास आहेत हे दाखविण्याचा प्रयत्न करतात.

पुरूषांच्या 'या' 7 वाईट सवयी महिलांना अजिबात आवडतं नाही
Kitchen Hacks: हो...चिरल्यानंतरही आपण फळे फ्रेश ठेवू शकतो

दुसऱ्यांबाबत ईर्ष्या बाळगणारे, गॉसिप करणारे पुरूष :

असे पुरुष ना स्वत: कधी खुश राहतात ना कधी दुसऱ्यांच्या आनंदात खूश होतात. या लोकांमध्ये ईर्ष्येची भावना खूप जास्त असते. असे पुरूष ज्यापण नात्यांमध्ये असतात त्यात विष कालविण्याचे काम करतात. आपल्या आसपासच्या लोकांसाठी ते कधीच आनंदी होऊ शकत नाही. हे लोक दुसऱ्यांना खूप लवकर जज करतात आणि आपला मत तयार करतात. स्वत:ची ईर्ष्या हे लोक गॉसिपद्वारे व्यक्त करतात. महिला अशा पुरुषांचा द्वेष करतात.

खोटे बोलणारे पुरुष :

काही पुरुषांना खूप खोट बोलायची सवय असते. एक चूक लपविण्यासाठी ते कित्येकवेळा खोटं बोलतात. असे लोक फसविण्यामध्ये सर्वात पुढे असतात. रिलेशनशीपमध्ये असे पुरुष विश्वास ठेवण्याच्या लायकीचे नसतात. त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर नेहमी संशय येत राहतो. महिला अशा पुरुषांसोबत जास्त काळ रिलेशनमध्ये राहू शकत नाही.

कौतूक न करणारे पुरुष :

महिलांना असे पुरुष आजिबात आवडत नाही जे कोणतेही यश मिळविल्यानंतर महिलांचे कौतूक करत नाही किंवा त्यांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देत नाही. असे लोक पार्टनरचा ना सन्मान राखतात ना त्यांच्या भावनांचा आजिबात विचार करतात. अशा पुरुषांवर प्रेम करणे महिलांसाठी खूप अवघड असते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()