- गायत्री अकोलकर, महिला उद्योजक
‘विद्युत विकास’ ही माझ्या आजोबांनी १९६६ मध्ये सुरू केलेली फर्म. घरामध्ये माझे वडील, काका आणि आजोबा कायमच साइटविषयी चर्चा करत असत. त्यामुळे अगदी वयाच्या पाचव्या वर्षीच ‘साइट’ या शब्दाबाबत कुतूहल होते आणि त्या कुतूहलामुळेच मी आमच्या घरातील व्यवसायाशी जोडले गेले.