Women Health : तुम्हीही दिवसभर एकच पॅड वापरताय? हलगर्जीपणा सोडा, होऊ शकतात या गंभीर समस्या!

काही महिला २४ तास एकच पॅड वापरतात. पण, असे करणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते.
Women Health
Women Healthesakal
Updated on

Women Health :

पाळी हा प्रत्येक महिलेच्या जीवनातील महत्त्वाचा भाग आहे. प्रत्येक महिन्याला येणारी पाळी त्रासदायकच वाटते. पाळी येण्याआधी आणि आल्यानंतरही होणारा त्रास महिलांना असह्य होतो. पण, या काळात स्वच्छतेसाठी केली जाणारी हलगर्जी महिलांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.   

Women Health
Irregular Periods: मासिक पाळीच्या वेदनेत आराम मिळवून देतील ‘हे’ पदार्थ! वेदना होतील कमी

पाळीच्या काळात रक्तस्त्राव झाल्याने अनेक महिलांना समस्यांचा सामना करावा लागतो. शारीरिकच नाही मानसिक त्रासालाही या काळात सामोरे जावे लागते. पाळीच्या या काळात अनेक महिला काही चूका करतात. त्यापैकी एक म्हणजे एकच पॅड जास्तवेळ वापरणे. पाळीच्या चौथ्या किंवा पाचव्या दिवशी जेव्हा रक्तस्त्राव कमी होतो. तेव्हा हमखास महिला पॅड बदलणे टाळतात.

त्यामुळे काही महिला २४ तास एकच पॅड वापरतात. पण, असे करणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. गुरूग्राममधील केसीके बिर्ला हॉस्पिटलच्या स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.आस्था दयाल यांनी पाळीच्या काळात एकच पॅड वापरण्याच्या दुष्परिणामांबद्दल काही सल्ले दिले आहेत. ते जाणून घेऊयात.

Women Health
Mendeleev's Periodic Table : एक स्वप्न, संस्कृतची मदत अन् बदललं केमिस्ट्रीचं जग! 'पिरीयॉडिक टेबल'च्या निर्मितीची अनोखी कहाणी..

तज्ज्ञ सांगतात की, पाळीच्या काळात ४ ते ६ तासांच्या अंतराने पॅड बदलले पाहिजे. तुम्हाला होणारा रक्तस्त्राव कमी असो किंवा जास्त हा ६ तासांचा नियम पाळायलाच हवा. काही महिला किंवा तरूणी सकाळी वापरलेलं पॅड रात्री बदलतात. म्हणजे जवळजवळ त्या १२ तास एक पॅड वापरतात, असे करणे चुकीचे असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

योनीमधील इन्फेक्शन

तुम्ही एकच पॅड ६ तासांपेक्षा अधिक काळ वापरत असाल तर तुम्हाला योनीतील इन्फेक्शनला सामोरे जावे लागू शकते. आपल्या पॅडमधील विषाणू आपल्या योनीत प्रवेश करू शकतात. त्यामुळे फंगल इन्फेक्शनसारखा आजार तुम्हाला होऊ शखतो.

Women Health
Period Remedies : रोज खा भिजवलेले काळे मनुके, मासिक पाळीच्या सर्व समस्या दूर होतील

योनीतील खाज

तुम्हाला योनीमध्ये सतत खाज उठत असेल. तर, तुम्हीही ही मोठी चूक करत आहात. कारण, तुम्ही पाळीचे पॅड अधिक वेळ वापरत असाल. तर तुम्हाला योनीमध्ये खाज उटू शकते. खाजेसोबत,रॅश आणि योनीतील त्वचा सोलणे अशा समस्या होऊ शकतात.  

Women Health
निवडणूक काळात वाहतूक नियमांची ऐशीतैशी

गर्भाशयाचा कॅन्सर

महिलांच्या शरीरातील महत्वाचा अवयव असतो तो म्हणजे गर्भाशय. महिलांना आपल्या बाळाला जन्म देण्यासाठी गर्भाशयाची गरज असते. त्यामुळेच, हा महत्त्वाचा अवयव आहे. पण, अलिकडच्या काळात गर्भाशयाच्या कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे. त्याचे एक कारण, हे सुद्धा असू शकते. महिला अधिक काळ वापरत असलेले एक पॅड.

एक पॅड अधिक काळ वापरत असाल तर त्यातून विषाणू आपल्या योनीतून गर्भाशयात जातात. आणि आपल्याला गर्भाशयाचा कॅन्सरही होऊ शकतो.

Women Health
प्रेग्नेंट की..? वयाच्या पन्नाशीत Periods मिस होण्याच नेमका अर्थ काय? ट्विंकल खन्ना गोंधळली

योनीतून येणारी दुर्गंधी

काहीवेळा महिलांना योनीतील दुर्गंधीचा त्रास होतो. जास्तवेळा वापरलेला पॅड हाच याचे कारण आहे. त्यामुळे, या समस्यांसाठी तुम्ही पॅड वापरताना योग्य ती काळजी घ्यावी. ज्यामुळे तुमचा पाळीचा त्रास कमी होईल आणि पाळीच्या समस्यांतूनही सुटका होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.