Women Health: मूत्रपिंडाचा आजार होण्याची ही आहेत कारणे; महिलांनो अशी घ्या काळजी!

कोणत्या कारणांमुळे महिलांना मूत्रपिंडाचा आजार होतो ?
Women Health
Women Healthesakal
Updated on

Women Health: मूत्रपिंडाची समस्या आजच्या काळात एक सामान्य समस्या आहे. महिलांमध्ये ही समस्या अधिक दिसून येत आहे. कारण स्त्रिया आपल्या आजाराकडे दुर्लक्ष करतात. किडनीची समस्या कोणालाही होऊ शकते, मग ती स्त्री असो वा पुरुष.

खरंतर किडनीचे आजार हे स्त्री व पुरूष दोघांमध्येही वाढताना दिसतात, पण महिलांमध्ये किडनी स्टोन आणि युरिन इन्फेक्शनची समस्या जास्त पहायला मिळते. याचे सगळ्यात मोठे कारण म्हणजे स्त्रिया या किडनी खराब होण्याच्या लक्षणांकडे नीट लक्ष देत नाहीत किंवा दुर्लक्ष करतात.

अशा परिस्थितीत हा त्रास वाढू लागतो. कोणत्या कारणांमुळे महिलांना मूत्रपिंडाचा आजार होतो ? हे जाणून घेणेही महत्वाचे ठरते.

Women Health
Caution बिअरच्या सेवनामुळे Kidney च्या समस्यांसोबतच वाढतील इतर धोके

महिलांना मूत्रपिंडाची समस्या होण्याची ही प्रमुख कारणे आहेत

गरोदरपणा

गरोदरपणात महिलांना मूत्रपिंडाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. तसे तर अनेकवेळा महिलांच्या मूत्रपिंडावर या वेळी दबाव येतो आणि अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे ही समस्या टाळण्यासाठी वेळोवेळी डॉक्टरांना नक्की भेटा.

हार्मोनल असंतुलन

स्त्रियांमध्ये पीसीओएस असण्यामुळे मूत्रपिंडाच्या तीव्र आजाराचा धोका वाढू शकतो. अशा वेळी शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य जीवनशैलीचे पालन करा. जेवणाच्या दरम्यान दीर्घ विश्रांती घेऊ नका. त्याचबरोबर शारीरिक हालचालींवर लक्ष ठेवा.

यूटीआय

महिलांना यूटीआयची समस्या असल्यास मूत्रपिंडाचा त्रास होऊ शकतो. ही समस्या पुरुषांपेक्षा महिलांमध्ये जास्त दिसून येते, त्यामुळे तुम्हाला ही समस्या असली तरी त्याकडे दुर्लक्ष करू नका, पण डॉक्टरांना नक्की भेटा.

Women Health
Damage Kidney Symptoms : तुमच्या लघवीचा रंगच सांगतो किडनीची कंडिशन? ऐका रामदेव बाबांचा लाखमोलाचा सल्ला

मधुमेहाच्या समस्या

मधुमेहामुळे मूत्रपिंडाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. बर्याच वेळा रक्तातील साखर जास्त काळासाठी खूप जास्त राहते. ज्यामुळे किडनी खराब होऊ शकते. अशावेळी जर तुम्हाला ही समस्या टाळायची असेल तर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवा.

तणाव

तणावाखाली राहिल्याने किडनीस्टोन देखील होऊ शकतो. होय, ज्या स्त्रिया जास्त तणावाखाली असतात त्यांना मूत्रपिंडाशी संबंधित समस्या असू शकतात.

मूत्रपिंडाच्या आजाराची लक्षणे

सारखा थकवा येणे, ऊर्जा कमी पडल्यासारखे वाटणे व एकाग्रतेने काम करणे अवघड होणे. मूत्रपिंडाच्या कार्यक्षमतेवर परिणाम झाल्यास रक्तातील अनावश्यक घटक वाढू शकतात. त्यामुळे ही लक्षणे दिसून येतात. याची तीव्रता अधिक असेल, तर अशा स्थितीला अ‍ॅनिमिया म्हणतात.

झोप न लागणे. जेव्हा मूत्रपिंड आपले कार्य पार पाडू शकत नाही, तेव्हा अनावश्यक घटक रक्तातच राहतात आणि मूत्रनलिकेतून बाहेर पडत नाहीत. अशा प्रकारच्या आजारांचा संबंध लठ्ठपणाशी असतो.

Women Health
Caution बिअरच्या सेवनामुळे Kidney च्या समस्यांसोबतच वाढतील इतर धोके

त्वचेला कोरडेपणा व खाज येणे. अशा प्रकारची त्वचा ही मूत्रपिंडांच्या आजारासह होणाऱ्या खनिज व हाडांच्या आजारांचे लक्षण असू शकते. मूत्रपिंडाची कार्यक्षमता कमी झाल्यास रक्तातील खनिज व पोषक द्रव्यांची पातळी नियंत्रणात राहत नाही.

सारखे लघवीस जाणे. मूत्रपिंडातील फिल्टर्स निकामी झाल्यास किंवा युरिनरी इन्फेक्शन झाल्यास हे लक्षण दिसू शकते.

या गोष्टींकडेही द्या लक्ष

  • योग्य खाणेपिणे

  • दिवसभरात कमीत कमी ७ – ८ ग्लास पाणी प्यावे.

  • गरोदर महिलांनी रुटीन चेक अप नियमितपणे करावेच

  • शरीरात प्रोटीनची मात्रा वाढू देऊ नये.

हि गोष्ट लक्षात ठेवा

हार्मोनल विकार किंवा हार्मोनल समस्यांमुळे स्त्रियांमध्ये PCOS आणि PCOD सारख्या समस्या उद्भवतात. तसेच PCOS मुळे काही वेळा किडनीवरही विपरीत परिणाम होऊ शकतो. यामुळे क्रोनिक किडनी डिसीज होऊ शकतो. त्यामुळे पीसीओएस आणि पीसीओडीसारख्या आजारांकडे लक्ष देणे आणि त्यावर वेळीच उपचार करणे आवश्यक आहे, असे तज्ज्ञ सांगतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()