Thyroid : थायरॉईडच्या समस्येपासून सुटका हवीये? मग या टिप्स फॉलो करा

आजकाल थायरॉईडच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आजकाल महिलांमध्ये थायरॉईड संप्रेरकांच्या असंतुलनाची समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.
Thyroid
Thyroid sakal
Updated on

आजकाल थायरॉईडच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जरी अनेक पुरुषांना देखील थायरॉईडचा (Thyroid) त्रास होत असला तरी मात्र, स्त्रियांमध्ये मोठ्या प्रमाणात थायरॉईडचा त्रास दिसतो. हा आजार शरीरातील हार्मोनल असंतुलनामुळे होतो. यामध्ये असंतुलनामुळे महिलांचे पचन, मासिक पाळी, मूड आणि वजन यासह अनेक गोष्टींवर परिणाम होतो. जर तुम्हाला थायरॉइडची समस्या असेल तर औषधांसोबत तुम्ही त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही टिप्सचीही मदत घेऊ शकता.

या टिप्स फॉलो करा

तुमची थायरॉईड लेव्हल वेळोवेळी तपासा.

पुरेशा प्रमाणात पाणी प्या. शरीर हायड्रेटेड राहणे खूप महत्वाचे आहे.

तुमच्या आहारात फळे, भाज्या, शेंगदाणे आणि बिया यांसारख्या अँटी-ऑक्सिडेंटयुक्त पदार्थांचा समावेश करा.

हे ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करते आणि थायरॉईड कार्य सुधारते.

आपल्या आहारात साखर आणि साखरयुक्त पेये कमी करा. यामुळे रक्तातील साखरेची पातळी योग्य राहते आणि थायरॉईडच्या आरोग्यासाठीही हे महत्त्वाचे असते.

तुमची थायरॉईड पातळी कमी किंवा जास्त असल्यास, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार डोस घ्या.

थायरॉईड संप्रेरकातील चढ-उतार चयापचय आणि उर्जेच्या पातळीवर परिणाम करतात.

Thyroid
Women Health : चाळीशीनंतर सुरू करायचाय योग? महिलांना फायदेशीर ठरतील ही आसने.. जाणून घ्या

चयापचय वाढविण्यासाठी फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटी खूप महत्वाची आहे. त्यामुळे व्यायाम करा.

आहारात अंडी आणि दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करा.

यामुळे शरीराला प्रथिने, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी सारखी पोषक तत्वे पुरेशा प्रमाणात मिळतात.

याशिवाय कार्ब्स, प्रोटीन्स आणि हेल्दी फॅट्स यांचे मिश्रण करून संतुलित आहार घ्या.

रात्री हलके जेवण करा. रात्रीचे जेवण झोपण्याच्या २-३ तास ​​आधी घ्या.

यामुळे पचनाशी संबंधित समस्या कमी होतील.

थायरॉईड (Thyroid) हा एक असा आजार आहे, ज्यासाठी चुकीची लाइफस्टाइल कारणीभूत आहे. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे थायरॉईडसारखे आजार होतात. हा एक असा आजार आहे ज्याचा महिलांना जास्त धोका असतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.